तुम्ही वापरत असलेलं व्हॉट्सअप बनावट तर नाही ना?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : सोशल मीडिया म्हटले की, फेसबुक आणि व्हॉटसअॅपचे नाव समोर येते. आज मोठ्या प्रमाणात या दोन माध्यमांचा वापर केला जातो. मात्र आता व्हॉटसअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक यूजर्स अधिकृत व्हॉटसअॅपचा वापर करत नसून नकली (substitute) व्हॉटसअॅपचा वापर करत आहेत. व्हॉटसअॅपच्या बनावट अॅपचा (क्लोन्ड अॅप) वापर वाढला आहे. गेल्या काही दिवसापासून बनावट व्हॉटसअॅप वापरणाऱ्या […]

तुम्ही वापरत असलेलं व्हॉट्सअप बनावट तर नाही ना?
Follow us on

मुंबई : सोशल मीडिया म्हटले की, फेसबुक आणि व्हॉटसअॅपचे नाव समोर येते. आज मोठ्या प्रमाणात या दोन माध्यमांचा वापर केला जातो. मात्र आता व्हॉटसअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक यूजर्स अधिकृत व्हॉटसअॅपचा वापर करत नसून नकली (substitute) व्हॉटसअॅपचा वापर करत आहेत. व्हॉटसअॅपच्या बनावट अॅपचा (क्लोन्ड अॅप) वापर वाढला आहे. गेल्या काही दिवसापासून बनावट व्हॉटसअॅप वापरणाऱ्या यूजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

व्हॉटसअॅपकडून बनावट व्हॉटसअॅपचा वापर करणाऱ्या यूजर्सला चेतावनी देण्यात आली आहे की, बनावट व्हॉटसअॅप तातडीने बंद करावे. लवकरात लवकर यूजर्सने आपले अकाऊंट अधिकृत व्हॉटसअॅपवर सुरु करावे. जर कुणी असं केले नाही, तर त्याचे अकाऊंट कायमचे बंद होऊ शकते.

या दोन अॅपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु नका

व्हॉटसअॅपने आपल्या रिसर्चमध्ये पाहिले आहे की, आपले अनेक यूजर्स व्हॉटसअॅपला मिळत्या जुळत्या अशा थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. यामध्ये विशेष म्हणजे दोन अॅप असे आहेत, ज्यांचा वापर वेगाने वाढत आहे. ‘जीबी व्हॉटसअॅप’ आणि ‘व्हॉटसअॅप प्लस’चा समावेश आहे. व्हॉटसअॅपने या अॅपचा वापर तातडीने बंद करण्यास सांगितले आहे.

कसे ओळखाल बनावट अॅप?

व्हॉटसअॅपने आपल्या फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQ) सेक्शनमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या सेक्शनमध्ये जर यूजर्सला अकाऊंटमध्ये ‘Temporarily banned’ लिहिलेलं येत असेल, तर याचा अर्थ हा यूजर बनावट व्हॉटसअॅप वापरत आहे. यूजर्स थर्ड पार्टी अॅप वापरत असून व्हॉटसअॅपच्या नियमांचे उल्लंघन करत आहे आणि व्हॉटसअॅप अशा अॅपला सपोर्ट करत नाही.