WhatsApp ओपन न करता पूर्ण मेसेज वाचा, मेसेज रीड केल्याचं समोरच्याला कळणारच नाही
व्हॉट्सॲप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा जगभरात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकांना व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज वाचल्यानंतर रिड रिपोर्ट लपवायचा असतो, जेणेकरून ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला आहे त्याला कळू नये की, आपण तो मेसेज वाचला आहे.
1 / 5

2 / 5
आज आम्ही तुम्हाला या इंस्टंट मेसेजिंग ॲपमधले मेसेज गुप्तपणे वाचण्यासाठी खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने युजर्स मेसेज सहज आणि पूर्णपणे मेसेज वाचू शकतील, तसेच मेसेज वाचल्याचा रीड रिपोर्ट समोरच्याला व्यक्तिला जाणार नाही.
3 / 5
यासाठी युजर्सना फोनच्या होम स्क्रीनवर क्लिक करावे लागेल किंवा रिकाम्या स्क्रीनवर क्लिक करुन होल्ड करावे लागेल. स्क्रीनच्या खालच्या बाजूला विजेट्सचा पर्याय दिसेल.
4 / 5
व्हॉट्सॲपचा पर्याय विजेट्सच्या पर्यायांमध्ये दिसेल, जो ड्रॅग करून होम स्क्रीनवर आणता येईल. हे विजेट होम स्क्रीनवर कुठेही ठेवता येईल.
5 / 5
यानंतर, व्हॉट्सअॅपच्या विजेट्समध्ये तेच मेसेज दिसतील, जे तुम्ही अद्याप वाचलेले नाहीत. यामध्ये तुम्ही क्लिक न करता पूर्ण मेसेज पाहू शकता. या पर्यायाद्वारे मेसेज वाचल्यानंतरही रीड रिपोर्ट यूजर्सना पाठवला जाणार नाही.