मुंबई : व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपल्याला व्हॉट्सअॅप पाहायला मिळतं. कारण या माध्यमातून संवाद साधणं सर्वात सोपं आहे. फोटो, मेसेज, व्हिडीओ, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल सर्वकाही एकाच ठिकाणी मिळतं. त्यामुळ व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅपवर आपण अनेक महत्त्वाचे मेसेज सेव्ह करून ठेवतो. पण कधीतरी डिव्हाइस रिसेट किंवा बदलताना नकळत महत्त्वाचा मेसेज डिलीट होतो. मग डिलीट झालेला मेसेज रिकव्हर करता येतो की नाही हा प्रश्न आपल्या मनात घर करून राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आज जाणून घेऊयात.
जर तुम्ही अँड्रॉईड युजर्स असाल तर गुगल ड्राईव्ह किंवा इंटरनल स्टोरेजमध्ये चॅट हिस्ट्रीचं दररोज, साप्ताहिक किंवा मासिक आधारावर बॅकअप घेतला जातो. या माध्यमातून तुम्ही जुने डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करू शकता. तसेच ऑटो बॅकअप देखील करु शकता. ऑटो बॅकअपमधून तुम्ही शेवटचाच बॅकअप असलेले मेसेजच रिकव्हर करू शकता.
तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप चॅट तुम्ही त्याच फोन नंबर आणि गुगल अकाउंटवरून रिकव्हर करू शकता. सर्वात आधी तुम्हाला अँड्रॉईड डिवाईसवरून व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. आता व्हॉट्सअॅप ओपन करताना रजिस्टर्ड व्हॉट्सअॅप नंबर भरा. त्याच नंबरवर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशनंतर गुगल ड्राईव्हवरुन चॅट बॅकअपचा पर्याय मिळेल.
चॅट रिस्टोर करण्यासाठी रिस्टोर टॅपवर क्लिक करा. इनिशियलायझेशन पूर्ण झाल्यानंतर सर्व चॅट सर्च करण्यासाठी नेक्टवर क्लिक करा. आता तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता. त्याचबरोबर फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स डाउनलोड होतील.
गुगलवर चॅट हिस्ट्री बॅकअप नसेल तर व्हॉट्सअॅप ऑटोमेटिक लोकल बॅकअप फाइलमधून घेऊ शकता. तु्म्हाला फाइल एक्सप्लोरर, कम्प्युटर किंवा एसडी कार्डचा वापर करून व्हॉट्सअॅप फाईल अँड्रॉईडवर ट्रान्सफर कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला सर्वात आधी अँड्रॉईड फोनमध्ये फाइल मॅनेजमेंट अॅप डाउनलोड करावे लागेल किंवा आधीपासूनच असेल तर अॅप ओपन करा.
आता व्हॉट्सअॅप 12 आणि त्यावरील डिव्हाइससाठी /SDCard/WhatsApp/Dateabases किंवा Android/ Media/ Com./ WhatsApp/ Backups वर नेव्हिगेट करा. आता बॅकअॅप लिस्टमधून फाइल कॉपी करा आणि सध्याच्या डिव्हाइसमध्ये इंटरनल स्टोरेजमध्ये डाटाबेस फोल्डरमध्ये पेस्ट करा.
आयफोनमध्ये आयक्लाउड बॅकअप आहे. सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सेटिंग/चॅट/चॅट बॅकअपवर जा. जर फोनमध्ये आयक्लाउड बॅकअप असेल तर व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर करू शकता.
व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. इंस्टॉल पूर्ण केल्यानंतर अॅप ओपन करा आणि फोन व्हेरिफाय करा. आयक्लाउडवर सेटिंग/चॅट/चॅट बॅकअपवर जा. त्यातून मेसेज रिकव्हर होतील.