मुंबई : तैवानची स्मार्टफोन कंपनी HTC ने तैवानमध्ये HTC Desire 20+ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, नॉच्ड सेल्फी कॅमेरा आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) हा फोन लाँच करण्यात आला आहे. (HTC Desire 20+ launched with quad camera setup and 500 mAh battery)
कंपनीने HTC Desire 20+ हा स्मार्टफोन डॉन ऑरेंज आणि ट्वाइलाइट ब्लॅक या दोन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8490 न्यू तैवान डॉलर (जवळजवळ 21,700 रुपये) इतकी आहे.
HTC Desire 20+ चे स्पेसिफिकेशन्स
हा स्मार्टफोन एक डुअल सिम फोन आहे जो अँड्रॉयड 10 वर चालतो. यामध्ये तुम्हाला 6.5 इंचांचा HD+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 इतका आहे. यामध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसरसह 6 जीबी रॅम देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा, 5 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, तिसरा आणि चौथा कॅमरा क्रमशः 2 आणि 5 मेगापिक्सलचा आहे. यासोबतच तुम्हाला डुअल एलईडी फ्लॅशसुद्धा आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.
HTC Desire 20+ मध्ये तुम्हाला 128GB इतकी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवली जाऊ शकते. सोबतच या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी QC4.0 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये अँबियंट लाइट सेन्सर, जायरो सेन्सर, डायनॅमिक ग्रॅव्हिटी सेन्सर, कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरसह मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स
iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात
Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री
(HTC Desire 20+ launched with quad camera setup and 500 mAh battery)