अखेर Hyundai ची SUV Venue लॉन्च, किंमत तब्बल…

| Updated on: May 21, 2019 | 5:25 PM

नवी दिल्ली : Hyundai ने नवी दिल्लीमधील एका कार्यक्रमात अखेर बहुप्रतिक्षित सब कॉम्पॅक्ट SUV Venue लॉन्च केली. ही गाडी लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीने गेल्या महिन्यात दिली होती. SUV Venue ची बुकिंग 2 मे पासून सुरु झाली होती. Hyundai ने भारतात पहिल्यांदाच सब 4-मीटर कॉम्पॅक्ट SUV लॉन्च केली. त्यासोबतच ही कंपनीची पहिली कनेक्टेड कार […]

अखेर Hyundai ची SUV Venue लॉन्च, किंमत तब्बल...
Follow us on

नवी दिल्ली : Hyundai ने नवी दिल्लीमधील एका कार्यक्रमात अखेर बहुप्रतिक्षित सब कॉम्पॅक्ट SUV Venue लॉन्च केली. ही गाडी लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीने गेल्या महिन्यात दिली होती. SUV Venue ची बुकिंग 2 मे पासून सुरु झाली होती. Hyundai ने भारतात पहिल्यांदाच सब 4-मीटर कॉम्पॅक्ट SUV लॉन्च केली. त्यासोबतच ही कंपनीची पहिली कनेक्टेड कार आहे. या गाडीची दिल्ली एक्स शोरुममधील किंमत 6 लाख 50 हजार इतकी ठेवण्यात आली आहे.

फीचर्स :

Hyundai च्या SUV Venue मध्ये LED DRIs सोबत प्रोजेक्टर हेडलॅम्प, डार्क क्रोम ग्रिल, प्रोजेक्टर टाईप फॉग लॅमेप, LED टेल लॅम्प आणि शार्क फिन एन्टिना देण्यात आला आहे. यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रिन इंफोटेंमेन्ट सिस्टीम देण्यात आला आहे. यामुळे Hyundai च्या ब्लुलिंक टेक्नोलॉजीला ऑपरट करता येणार आहे. कनेक्टेड SUV असल्याने यामध्ये एकूण 33 कनेक्टिव्हीटी फीचर्स देण्यात आले आहेत.  यापैकी 10 हे भारतासाठी आहेत.

या फीचर्समध्ये लोकेशन बेस्ड सर्व्हिसे, AI बेस्ड वॉईस कमांड आणि इंजिन, AC आणि दरवाज्यांसाठी रिमोट फंक्शन यांसारखे फीचर्स आहेत. त्याशिवाय यामध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, वायरलेस फोन चार्जिंग, एअर प्युरिफायर आणि क्रुज कंट्रोलही देण्यात आले आहे.

या गाडीची लांबी 3,995 mm आणि रुंदी 1,770 mm आहे. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ड्युअल फ्रंट एअरबॅग, ABS, BAS, HAC, ESC/ESP, VSM, स्पीड सेंसिंग ऑटो डोअर लॉक, सीट-बेल्ट रिमायंडर आणि रियर पार्किंग सेंसर देण्यात आले आहे.

Hyundai Venue च्या इंजिनबाबत सांगायचं झालं तर, यामध्ये एक-दोन नाही तर तीन इंजिनचं ऑप्शन देण्यात आलं आहे. यामधील 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 120 PS पावर आणि 172 Nm चं पिक टॉर्क जनरेट करेल. यासोबतच 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सही देण्यात आला आहे. यामध्ये इन-हाउस डेव्हलप्ड 7-स्पीड डबल क्लच ट्रांसमिशन (DCT) याचंही ऑप्शन देण्यात आलं आहे.

Hyundai Venue मध्ये 1.2-लीटर MPI पेट्रोल इंजिनचं ऑप्शनही देण्यात आलं आहे. हे इंजिन 83 PS पावर आणि 115 Nm चं पिक टॉर्क जनरेट करेल. त्यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सचं ऑप्शनही देण्यात आलं आहे.

डिझेल इंजिनमध्ये 1.4 लीटरचं यूनिट देण्यात आलं आहे. हे इंजिन 90 PS पावर आणि 220 Nm चं पिक टॉर्क जनरेट करेल. त्यासोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचं ऑप्शनही देण्यात आलं आहे.