मोबाईलच्या जास्त वापरामुळे हार्ट अटॅक? दाव्यात दम तरी काय

| Updated on: Oct 28, 2023 | 2:38 PM

Mobile Heart Attack | तरुणांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तेजीने वाढत आहे. त्यामागे एक प्रमुख कारण तुमचा Smartphone असल्याचे समोर आलं आहे. तुम्हाला वाटेल हे कसं काय, एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. जास्त स्क्रीन टाईम तुम्हाला आजारी करु शकतो. काय आहे हे संशोधन, काय केला त्यामध्ये दावा?

मोबाईलच्या जास्त वापरामुळे हार्ट अटॅक? दाव्यात दम तरी काय
Follow us on

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : या आधुनिक युगात Smartphones हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. अनेक लोक मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. काही जण तर चालताना, वाहन चालविताना पण मोबाईलचा वापर करताना दिसून येतात. काहींना तर प्रत्येक मिनिटाला नाहक मोबाईल उघडून बघावा वाटतो. सोशल मीडियावर काय चाललंय, व्हॉट्सअप, फेसबुक हे पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मोबाईलची एक प्रकारे नशाच चढली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हीच सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. लोकांमध्ये Mobile ची सवय तेजीने वाढत चालली आहे. या वाढलेल्या स्क्रीन टायमिंगमुळे आरोग्य बिघडत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

मोबाईलची सवय

नागरिकांमध्ये मोबाईल फोनची सवय तेजीने वाढत चालली आहे. ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे समोर येत आहे. लहान मुलांचा पण स्क्रीन टाईम वाढला आहे. लहान मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. तरुणाई तर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. स्क्रीन टायमिंग वाढल्याचे दुष्परिणाम काय होतात. यावर संशोधन सुरु आहेत. त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे.

हे सुद्धा वाचा

मुलांच्या वाढीवर परिणाम

मुलांमध्ये मोबाईलचे फॅड वाढले आहे. सतत मोबाईल पाहत असल्याने त्यांच्या मेंदूवर, जडणघडणीसह वाढीवर परिणाम होत आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी काँग्रेस 2023 मधील नवीन संशोधनानुसार जी मुलं जास्त वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे. त्यांना तरुणीपणी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. हे प्रमाण एकदम वाढते.

खेळणार नाही तर होईल ‘खेळ’

संशोधनानुसार, जी मुलं लहानपणी मोबाईल गेममध्ये जास्त वेळ घालवतात. बाहेर खेळत नाही. मैदानावर वेळ देत नाहीत. त्यांना कमी वयात हृदय रोगाची समस्या अधिक असते. त्यांना स्ट्रोक येण्याची भीती अधिक असते. मैदानी खेळामुळे अवयव मजबूत होतात. तरुणीपणी अशा मुलांचे हृदय तंदुरुस्त असते. त्यांना शारीरिक रोग होण्याचे प्रमाण कमी असते.

मग उपाय तरी काय

हा धोका टाळण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आई-वडिलांनी मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. मोबाईलचा वापर कमी करणे हा पहिला उपाय आहे तर मुलांना मैदानावर पाठविणे हा दुसरा उपाय आहे. मुलांना त्यांच्या आवडीचा खेळ खेळू द्यावा. त्यांना व्यायामाचे धडे देणे आवश्यक आहे. मुलांना कमीत कमी वेळ मोबाईल देणे आणि त्यांना एखाद्या खेळात रमू देणे आवश्यक आहे.