IIIT : आयआयआयटी अलाहाबादच्या विद्यार्थ्यांची कमाल, सामान्य सायकलचे केले इलेक्ट्रीक सायकलमध्ये रूपांतर

| Updated on: May 25, 2023 | 2:46 PM

आयआयआयटी अलाहाबादच्या विद्यार्थ्यांनी साध्या सायकलीचे रुपांतर इलेक्ट्रीक सायकलीमध्ये करण्याचे तंत्र शोधले आहे. अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये साधी सायकल इलेक्ट्रीक करणे सहज शक्य आहे.

IIIT : आयआयआयटी अलाहाबादच्या विद्यार्थ्यांची कमाल, सामान्य सायकलचे केले इलेक्ट्रीक सायकलमध्ये रूपांतर
e-cycle
Image Credit source: socialmedia
Follow us on

प्रयागराज : बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रीक सायकल आहेत. त्यांची किंमत 25 हजारांपासून सुरू होते. परंतू आयआयआयटी अलाहाबाद येथून प्रशिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी एक ईको-सी प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्टार्टअप कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी आपल्या साध्या सायकलचे रुपांतर इलेक्ट्रीक सायकलमध्ये आपल्या गरजेनूसार करुन देणार आहे. या कंपनीला आंबेडकर सोशल इनोव्हेशन इनक्यूबेशन मिशनने गुंतवणूकीसाठी 30 लाखाचा निधी पुरविला आहे.

आयआयआयटी अलाहाबादचे विद्यार्थी गुगलोथ विजय नायक, रवि शंकर आणि विशाल यांनी साध्या सायकलचे इलेक्ट्रीक सायकलमध्ये रुपांतर करणारी स्टार्टअप सुरू केले आहे. गुगलोथ यांनी सांगितले की त्यांची कंपनी बाजारात उपलब्ध सायकलींना लोकांच्या पसंत आणि गरजेनूसार उपकरणे लावून तिचे रुपांतर इलेक्ट्रीक सायकलमध्ये करेल. एका सायकलीला इलेक्ट्रीक सायकलमध्ये परावर्तित करण्यासाठी सुमारे 18000 रूपये खर्च येईल. यात वेगळी करता येणारी बॅटरी लावली जाईल. त्यामुळे बॅटरी काढून तिला घरी रिर्चाज करता येईल.

या इलेक्ट्रीक सायकलीला सुमारे 7000 रुपये किंमतीची बॅटरी लागते. ती बॅटरी एकदा रिचार्ज केल्यास सुमारे 30 किलोमीटरपर्यंत सायकल धावेल. ही सायकल 85 किलोग्रॅमपर्यंतचे वजन वाहू शकेल. जर कोणाला कंपनीकडून इलेक्ट्रीक सायकल विकत घ्यायची असेल तर 22,000 रूपये किंमत पडेल. कंपनीने एक सायकल आयआयटी मंडी ( हिमाचल ) आणि दोन सायकली तेलंगणामध्ये विकल्या असून त्यांच्या प्रतिसाद अतिशय चांगला आहे.

जुन्या सायकलीचे दहा हजारात रुपांतर

गुगलोथ विजय नायक सांगतात की, सध्या एकावेळी तीस किलोमीटरपर्यंत जाण्यासाठी सायकलची रचना केली आहे. ज्याची किंमत 22 हजार रुपये आहे. आतापर्यंतच्या उपलब्ध तंत्रज्ञानानुसार 60 किलोमीटरपर्यंत जाणाऱ्या सायकली तयार करणे शक्य आहे. जर एखाद्याला दररोज केवळ 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल आणि त्याच्याकडे जुनी सायकल असेल तर त्याला इलेक्ट्रिक सायकलमध्ये तिचे रुपांतर करण्यासाठी सुमारे 10 हजार रुपये मोजावे लागतील. सध्या एवढ्या कमी किंमतीत बाजारात सायकल उपलब्ध नाही.