नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : Instagram आता समाज माध्यमांसाठी असा प्लॅटफॉर्म झाला आहे की, अनेक लोक त्यावर लाखो रुपयांची कमाई करत आहेत. इन्स्टाग्रामवर पैसा कमविण्यासाठी अगोदर खर्च करावे लागतात, असा काहीचा समज आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. तो एडिट करायचा आणि नंतर हा व्हिडिओ अपलोड करायचा असा काहींचा समज आहे. पण असं करण्याची गरज नाही. तुम्ही या ट्रिक्स आणि टिप्सच्या मदतीने तुमचे चाहते वाढवू शकतात. त्यासाठी ही वेबसाईट महत्वाची आहे. व्हिडिओ डाऊनलोड करुन तुम्हाला काही दिवसांतच फॉलोअर्स संख्या वाढू शकते.
असे वाढतील फॉलोअर्स
या Instagram Trick तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. त्यामुळे सहज तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल. तुम्ही फॉलोअर्सची संख्या वाढण्यासाठी पेड पार्टनरशिपसारख्या प्रकल्पात पण सहभागी होऊ शकतात. त्यामाध्यमातून तुमची जबरदस्त कमाई होईल. इस्टाग्रामवर असे काही अकाऊंट्स आहेत, ज्यांनी केवळ 50 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.1 दशलक्ष आहे. केवळ 50 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण असा करिष्मा करता येऊ शकतो.