मुंबई : काही वर्षांपूर्वी गेमिंग ही आवड फक्त महागड्या कॉम्प्युटर वापरणाऱ्यांसाठी होती. पण या परिस्थितीत आता बदल झालेला दिसत आहे आणि गेमर्स आता स्मार्टफोनवर गेम्स खेळत आहेत. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन्स आणि इंटरनेट डेटाची कमी झालेली किंमत. भारतात आज अनेकजण एका तासापेक्षांही जास्त वेळ गेम खेळत असतात. हा आकडा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या 45 मिनिटांपेक्षा जास्त आहे.
भारतात गेमर्सची संख्या जास्त
मोबाईल मार्केटिंग असोसिएशन्स पॉवर ऑफ मोबाईल गेमिंग इन इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतात चार गेमर्सच्या मागे तीन गेमर्स मोबाईलवर दिवसाला दोनवेळा गेम खेळतात. तसेच 25 करोड गेमर्ससोबत भारत मोबाईल गेम खेळण्यातील यादीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे आकडे पाहून काही दिवसांनी भारत या यादीमध्ये सर्वात अव्वल क्रमांकाचा देश व्हायला वेळ लागणार नाही.
PUBG मुळे गेममध्ये क्रेझ वाढली
मेबाईल गेम्स आल्यापासून आता प्राईम टाईममध्ये टीव्ही सुद्धा कमी पाहिला जातो आणि संध्याकाळी 7 ते रात्रीपर्यंत जास्त करुन मोबाईल गेम खेळताना लोक दिसतात. मोबाईल गेमच्या विश्वात PUBG ने या आकड्यांमध्ये वाढ केली आहे. मार्चमध्ये लाँच झालेला हा गेम सध्या संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाला आहे. जाना ब्राऊजरद्वारे करण्यात आलेल्या क्वार्ट सर्वेनुसार अंदाजे 1,047 लोकांपैकी 62 टक्के लोकांनी आम्ही पबजी खेळलो असल्याचे सांगितले. बऱ्याच युजर्सने सांगितले या गेमच्या माध्यमातून भारतासोबत जगभरातील लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
टूर्नामेंट आणि थीम पार्टींचं आयोजन
PUBG गेमचे वेड लोकांमध्ये इतकं वाढलं आहे की, चेन्नईच्या वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने नुकतेच आपल्या विद्यार्थ्यांना PUBG गेम्स खेळण्यावर बंदी घातली आहे. भारतात सध्या PUBG गेम्सच्या टूर्नामेंट्सचंही आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीत या गेमच्या आधारावर एका थीम पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं आणि पुण्याच्या एका कपलने आपल्या लग्नाच्या प्री-वेडिंगचे शूटही या गेमच्या थीमवर केलं होतं.
PUBG गेम शिवाय पटनाच्या विकास जैसवालने बनवलेला गेम LUDO KING नेही सध्या जगभरातील गेमर्सला आपल्याकडे आकर्षित केले आहे. 2018 वर्षात तब्बल 18 करोड लोकांनी हा गेम आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केला आहे.