मुंबई : एक काळ असा होता की लोकांच्या हातात मोबाइल नव्हते. असले तरी ते खूप श्रीमंत लोकांकडेच असायचे. मग तंत्रज्ञान क्रांती झाली आणि मोबाइल सामान्य माणसाच्या हातात येऊ लागला. तो काळ 2G चा होता. मोबाईलमध्ये इंटरनेट होतं, परंतु खूप धिम्या गतीने ते चालायचं. त्यानंतर बाजारात 3G आलं, आणि लोकांना वेगवान इंटरनेट (Fast Internet) मिळू लागलं. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसारख्या अनेक कंपन्यांनी 3 जी सेवा देऊ केल्या आणि त्यानंतर 4G तंत्रज्ञान आले. (Indians eagerly waiting for 5G, users ready to pay double for fast internet service)
रिलायन्सचं व्हेंचर Jio ने थेट 4G लाँच केलं आणि काही महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट उपलब्ध करून देऊन लोकांना इंटरनेटची सवय लावली. नंतर इतर कंपन्यांनाही इंटरनेट दर कमी करावे लागले. येथे, G चा अर्थ Generation असा आहे. आपण सध्या भारतीय मोबाइल तंत्रज्ञानाच्या 4th Generation मध्ये आहोत. आता 5G तंत्रज्ञान सुरु होणार आहे. केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांना 5G संबंधित चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील 8 ते 20 महिन्यांमध्ये भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते.
एरिक्सनच्या अहवालानुसार, अशी माहिती समोर आली आहे की भारतात असे बरेच युजर्स आहेत ज्यांची अशी इच्छा आहे की, त्यांना लवकरात लवकर 5 जी सेवा वापरायला मिळावी. अहवालात असेही सांगितले आहे की, जगभरातील 300 मिलियन युजर्सपैकी एकट्या भारतात असे 40 मिलियन युजर्स आहेत जे या वर्षी त्यांचा फोन 5 जीमध्ये अपग्रेड करतील.
अहवालात असेही सांगितले गेले आहे की, भारतात 5 जी ची प्रतीक्षा इतकी आहे की, सध्या 67 टक्के युजर्स ही सेवा घेण्यासाठी तयार आहेत. त्याच वेळी, जेव्हा ही सेवा भारतात सुरू केली जाईल, तेव्हा युजर्स आतापेक्षा दुप्पट पैसे देण्यास तयार आहेत. म्हणजेच एखादी कंपनी 5 जी सेवेसह ओटीटी प्लॅटफॉर्मची ऑफर देत असेल तर युजर्स त्यासाठीदेखील तयार आहेत.
दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे. त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे.
5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही. भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली असून लवकरच टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एअरटेलनेही 5 जी नेटवर्कची चाचणी केली आहे.
वास्तविक, 5 जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4 जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5 जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.
टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पुढील 6-8 महिन्यांमध्ये भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते. कारण अनेक कंपन्या या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते डोमेस्टिक टेलिकॉम मार्केट 5G सेवांसाठी तयार होण्यास कमीत कमी 2 वर्ष लागू शकतात.
रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5 जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल आणि त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल. त्याच वेळी, एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या या ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परवानगीमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल.
टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (3.2 गीगाहर्ट्ज ते 3.67 गीगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (24.25 गीगाहर्ट्ज ते 28.5 गीगाहर्ट्ज) आणि सब-गीगाहर्ट्ज बँड (700 गीगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5 जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली आहे.
इतर बातम्या
सुस्साट इंटरनेट स्पीड पण 5G मुळे जीवसृष्टीवर संक्रांत? जाणून घ्या या तंत्रज्ञानमुळे काय बदल घडतील
5G Network टेस्टिंग सुरु, मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार
भारतात 5G टेस्टिंग सुरु, केंद्र सरकारने चिनी कंपन्यांना डावललं
भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका
भारतात 5G Network साठी टेस्टिंग, स्मार्टफोन युजर्सना लवकरच मिळणार सर्व्हिस
(Indians eagerly waiting for 5G, users ready to pay double for fast internet service)