मुंबई : प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार स्मार्टफोनची निवड करत असतो. पण आपल्या बजेटमध्ये असलेल्या फोनमध्ये आवश्यक फीचर्स असतीलच असं नाही. त्यामुळे आपण आपल्या बजेटमध्ये असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतो. नुकताच इन्फिनिक्स कंपनीने आपला नवा कोरा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने 7 जीबी रॅम सपोर्ट करणारा इन्फिनिक्स स्मार्ट 7 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये 7 जीबीपर्यंत रॅम सपोर्ट करणाऱ्या या मोबाईलमध्ये या स्मार्टफोनची गणती होते. तसेच या स्मार्टफोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा स्मार्टफोन नुकताच लाँच झालेल्या पोको सी50, रेडमी ए1, टेक्नो पॉप 7 प्रो यांच्याशी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊयात या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्सबाबत..
कंपनीने या सेगमेंटमध्ये सिंगल व्हेरियंट स्मार्टफोन लाँच केला आहे.4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 7299 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 27 फेब्रुवारीपासून सुरु होईल.या स्मार्टफोन 4 जीबी रॅम असला तरी 3 जीबी रॅम वर्च्युअली सपोर्ट करू शकतो. म्हणजेच सात जीबीपर्यंत वाढवू शकतो. इन्फिनिक्स स्मार्ट 7 अँड्रॉईड 10 वर आधारित एक्सओएस 12 वर काम करतो.
या स्मार्टफोनमध्ये 60 हर्ट्स रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. त्यामुळे 500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युनिसॉक एसी9863ए1 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी पॉवरव्हीआर जीपीयु दिलं आहे. स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे दिले आहेत. प्राथमिक कॅमेरा 13 एमपी आणि दुसरा कॅमेरा 2 एमपीचा आहे.तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी असून टाईप सी पोर्टच्या माध्यमातून 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो.