नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : हँडसेट निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी खास बजेट स्मार्टफोन दाखल केला आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत आणि त्यांच्या खिशाचा विचार करत हा स्मार्टफोन बाजारात उतरविण्यात आला आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये फीचर्सची रेलचेल आहे. हा बजेट स्मार्टफोन ग्राहकांना महागड्या iPhone चा फील दिल्याशिवाय राहणार नाही. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Apple Dynamic Island सारखे फीचर दिले आहे. त्याला मॅजिक रिंग असे नाव देण्यात आले आहे. जाणून घ्या Infinix Smart 8 HD ची किंमत, विक्रीची तारीख, ऑफर्स आणि स्मार्टफोनमध्ये दिलेल्या विविध फीचर्सविषयी…
Infinix Smart 8 HD ची किंमत काय
या ताज्या दमाच्या इनफिनिक्स स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज मिळते. या व्हेरिएंटची किंमत 6299 रुपये आहे. सध्या कंपनी हा स्मार्टफोन 5699 रुपयांना विक्री करणार आहे. या डिव्हाईसमध्ये शायनी गोल्ड, क्रिस्टल ग्रीन, गॅलेक्सी व्हाईट आणि टिंबर ब्लॅक रंगाचा समावेश आहे. कंपनीने अजून एक ऑफर ठेवली आहे. त्यानुसार, हा फोन खरेदी करताना तुम्ही एक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केला तर अजून 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. या स्मार्टफोनची विक्री 13 डिसेंबरपासून Flipkart वर सुरु होत आहे.
Infinix Smart 8 HD चे फीचर्स काय