Instagram ला फुटला घाम, Pixeled मध्ये असे काय खास, या ॲपला तरुणाईने घेतले डोक्यावर

| Updated on: Jan 16, 2025 | 3:29 PM

Instagram V/s Pixeled : इन्स्टाग्रामला टक्कर देण्यासाठी बाजारात एक नवीन ॲप Pixelfed आले आहे. हे ॲप आता Android आणि iOS या दोन्ही प्ले स्टोरवर सक्रिय झाले आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामच्या चिंतेत भर पडली आहे. कसे आहे हे नवीन ॲप?

Instagram ला फुटला घाम, Pixeled मध्ये असे काय खास, या ॲपला तरुणाईने घेतले डोक्यावर
इन्स्टाला टफ फाईट
Follow us on

Instagram हे एक लोकप्रिय फोटो-व्हिडिओ शेअरिंग ॲप आहे. या ॲपची तरूणांमध्ये मोठी क्रेझ आहे. तर आता इन्स्टाला टक्कर देण्यासाठी बाजारात नवीन ॲप आले आहे. हे ॲप अगदी इन्स्टाग्रामसारखं आहे. नवीन ॲप हे युझर्सच्या अधिक पसंतीला पडत आहे. त्यातील सुविधांमुळे ते लोकप्रिय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपैकी कोणत्या ॲपमध्ये जास्त फीचर्स, टूल्स आणि प्रायव्हेसी कंट्रोल आहे, ते समजून घेऊयात…

Pixelfed ची इन्स्टाग्रामला टफ फाईट

पिक्सेलफेड अशा नेटवर्कवर काम करते, ज्यामुळे युझर्सला डेटा आणि कंटेंटवर जास्त नियंत्रण मिळते. या ॲपमध्ये युझर्स फोटो शेअर करू शकतो. दुसऱ्याला फॉलो करू शकतो. याशिवाय विविध लोकांशी चॅटपण करता येते. हा प्लॅटफॉर्म फोडाईवर्ससोबत कनेक्ट आहे. हे ॲप मॅस्टोडॉन सारख्या इतर एक्टिविटीपब-बेस्ड नेटवर्कवर काम करते.

हे सुद्धा वाचा

सेम टू सेम

इतर Social Media प्लॅटफॉर्मप्रमाणेच पिक्सेलफेडवर युझर्स डेटा मध्यवर्ती सर्व्हरवर जतन केल्या जात नाही. त्यामाध्यमातून अनेक युझर्स एकाचवेळी अनेकांशी संवाद साधू शकतात. हे ॲप दिसायला सुद्धा इन्स्टाग्राम सारखे आहे. त्याचा इंटरफेस पण इस्टासारखाच आहे.

इन्स्टाग्रामला पिक्सेलफेडची टक्कर

मेटाच्या कंटेंट मॉडरेशनच्या घोषणेनंतर नवीन ॲप बाजारात दाखल करण्यात आले आहे. पिक्सेलफेड याच आठवड्यात लाँच करण्यात आले आहे. अनेक युझर्सने दावा केला आहे की, त्यांनी या नवीन ॲपची लिंक फेसबुकवर शेअर केली. पण आता मेटाने ही लिंक ब्लॉक केली आहे.

Engadget नुसार, मेटाने चुकीने पिक्सेलफेड लिंक ब्लॉक केली. आता युझर्सने या ॲपची लिंक शेअर केल्यावर ती ॲक्टिव दिसत आहे. पिक्सेलफेडचे सीईओ आणि संचाल डॅनियल सुपरनॉल्ट यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये TikTok ला पर्यायी लूप्स हे ॲप सुरू केले होते.

TikTok वर अमेरिकेत अनेक निर्बंध येत आहेत. तर काही जणांनी भारताप्रमाणे टिकटॉक अमेरिकेत बंद करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मेटाच्या कंटेंट मॉडरेशनमुळे वैतागलेल्या युजर्सला नवीन पिक्सेलफेड आणि लूप्स हे दोन चांगले पर्याय मिळाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.