मुंबई : इन्स्टाग्रामने लाईव्ह रूम्सची (Instagram Live Rooms) घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने, आता चार युजर्स (वापरकर्ते) एकाचवेळी लाइव्हमध्ये सहभागी होऊ शकतात. थेट प्रक्षेपण (लाईव्ह ब्रॉडकॉस्ट) दुप्पट करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. इन्स्टाग्रामने त्यांच्या या नव्या फीचरबाबत म्हटलं आहे की, जर एक युजर एकाच वेळी बर्याच लोकांसह लाईव्ह आला तर त्यामध्ये अधिक प्रेक्षक जोडले जातील. पूर्वी इन्स्टाग्रामवर, आपण फक्त एका युजरसह लाईव्ह जाऊ शकत होतो, परंतु आता आपण एकाच वेळी आपल्या लाइव्हमध्ये आणखी तीन लोकांना जोडू शकतो. (Instagram launches Live Rooms globally, will now allow up to four users to use feature)
हे फीचर लाँच झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरील पेजेस, बिझनेस अकाऊंट्स किंवा कंटेट क्रिएटर्सचा रिच अजून वाढेल. एकाहून अधिक गेस्टना घेऊन तुम्ही टॉक शो करणार असाल, तर हे फीचर तुमच्यासाठी आहे. ज्या युजर्सना त्यांच्या मित्रांसोबत लाईव्ह यायचं असेल, एकाचवेळी 3-4 जणांना गप्पा मारायच्या असतील, तर हे फीचर अशा युजर्ससाठी खास आहे.
इंस्टाग्रामच्या उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष (प्रोडक्ट व्हीपी) विशाल शाह म्हणाले की, आम्ही 2017 मध्ये लाईव्ह फीचर रोलआऊट केलं होतं. त्यात तुम्ही केवळ एका वापरकर्त्यासह लाईव्ह जाऊ शकत होता, परंतु लॉकडाऊन दरम्यान आम्ही पाहिले की युजर्स मोठ्या प्रमाणात हे फीचर वापरत आहेत. अशा स्थितीत आम्ही यामध्ये आता 4 जणांना एकत्र लाईव्ह येण्याची सुविधा देत आहोत.
या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इन्स्टाग्राम ओपन करावं लागेल. त्यानंतर स्वाईप लेफ्ट करुन तुम्हला लाईव्ह कॅमेरा हा पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला लाईव्ह रुसाठी टायटल द्यावं लागेल. त्यानंतर लाईव्ह रुम आयकॉनवर क्लिक करुन गेस्ट म्हणजेच तुमच्या मित्रांना अॅड करुन लाईव्ह जाता येईल. तुम्ही नेहमी स्क्रीनच्या टॉपला दिसाल. तर उर्वरित तीन मित्र खाली आणि तुमच्या शेजारी लाईव्ह दिसतील.
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी ट्विटरबाबत भारत सरकारने घेतलेली कडक भूमिका पाहता फेसुबकचे फोटो/व्हिडीओ अॅप असेलेले इन्स्टाग्राम जागरुक झाले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कंपनी ते अकाऊंट बंद करेल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.
एखाद्या व्यक्तीने वारंवार नियम मोडले तर त्या व्यक्तीचे अकाऊंट डिसेबल करण्यात येईल, असे इन्स्टाग्रामने स्पष्ट केले. मॅसेजिंगबाबत कंपनीचे नियमांपासून मुक्त होण्यासाठी तयार केलेली नवीन खातीही आम्ही डिसेबल करु. आम्ही इन्स्टाग्रामवर होत असेलेल्या मॅसेजिंगवर लक्ष ठेवून आहोत. जे अकाऊंट्स आक्षेपार्ह मॅसेज टाकण्यासाठी बनविण्यात आलेत असे निदर्शनास येईल ते अकाऊंट्स कंपनीकडून डिसेबल करण्यात येतील. अनेक देशांमध्ये पर्सनल अकाऊंट्सवर कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामकडून पुढे सांगण्यात आले की, अज्ञात व्यक्तीचे मेंशन आणि टॅग टाळायचे असल्यास तुम्ही टर्न ऑफचे ऑप्शन सिलेक्ट करु शकता. तसेच अनैच्छिक मॅसेज टाळण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉकही करु शकता.
Live Rooms has entered that chat ?
Today we’re rolling out a way for you + three other people to go Live together and do your thing ?? ?https://t.co/PiTilGv2Ag pic.twitter.com/l2OKvCBJh4
— Instagram (@instagram) March 1, 2021
संबंधित बातम्या
Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
गुगलचे फ्री स्टोरेज पर्याय बंद होणार, जाणून घ्या कसे कराल तुमचा डेटा स्टोरेज?
(Instagram launches Live Rooms globally, will now allow up to four users to use feature)