नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : तुम्ही इंस्टाग्रामवर रिल्स पोस्ट करीत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इस्टाग्राम रिल्ससाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. इंस्टाग्राम रिल्समध्ये ( Instagram Reels ) नवनवीन फिचर्स येत आहेत. आता अशी बातमी आली आहे की इंस्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरील रिल्सची मर्यादा वाढविणार आहे. इंस्टाग्रामवर आतापर्यंत रिल्सची मर्यादा तीन मिनिटांची होती त्याचा कालावधी आता चांगलाच वाढविण्यात येणार आहे.
इंस्टाग्रामवर रिल्स पोस्ट करणाऱ्या युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता इंस्टाग्रामवर केवळ तीन मिनिटांचा रिल्स पोस्ट करण्याची सोय होती. त्यामुळे व्हिडीओतील माहिती पूर्णपणे टाकता येत नव्हती. परंतू आता चक्क दहा मिनिटांची व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे. प्रसिद्ध इंजिनिअर एलेसँड्रो पलुझ्झी यांनी ट्वीटरवर ( एक्स ) माहीती दिली आहे. त्यानंतर टेकक्रंच या वेबसाईटशी बोलताना सांगितले की इंस्टाग्रामने म्हटले होते की सध्या या फिचरला एक्सटर्नली टेस्ट केलेले नाही.
आधी इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर मोठा व्हिडीओ पोस्ट करताना युजर्सला मल्टीपल पार्टमध्ये शेअर करावा लागायचा. एकाच व्हिडीओला विविध भागात पाहाताना युजर्सला कठीण जायचे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या व्हिडीओला स्वाईप करावे लागायचे. जर इंस्टाग्रामवर या फिचरला सर्वसामान्य युजरसाठी सुरु केले तर वाढलेल्या टाईम लेंथमुळे व्हिडीओचा आनंद घेता येईल. व्हिडीओ कन्टेट पाहणाऱ्यांना नव्हे तर क्रिएटर्सना देखील यास अपलोड करणे सोपे होईल. त्यामुळे आता इंस्टाग्रामची रिल्सची मर्यादा आता तीन मिनिटांवरुन वाढवून दहा मिनिटे करण्याची तयारी सुरु असून इंस्टाग्राम टिकटॉकची जागा घेऊ इच्छीत आहे.
इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोस्सेरी यांनी म्हटले होते की कंपनी असे पर्याय शोधून काढत आहे ज्यातून क्रिएटर्सना आपल्या फॅन्स जास्तीत जास्त गुंतवून ठेवू शकतील. मोस्सेरी यांनी सांगितले की एक आणखी एक फिचर आणले जात आहे ज्यात पब्लिक अकाऊंट युजर्स कोणत्याही पब्लिक फीड पोस्ट वा कमेंटला आपल्या स्टोरीजवर शेअर करु शकणार आहेत.