चीनचा इंटरनेट क्षेत्रात दबदबा आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्याचा दावा चीन करत आहे. हे एक क्लाऊड ब्रॉडबँड आहे. ते रॉकेटच्या गतीने ग्राहकांना इंटरनेट सेवा देते. चीनच्या दाव्यानुसार, क्लाऊड ब्रॉडबँड तंत्रज्ञानाच्या मदतीने युझर्स एका मिनिटांमध्ये जवळपास 90 – 8k चित्रपट सहज डाऊनलोड करु शकतील. या इंटरनेट सेवेला F5G-A (एंहेस्ड ऑल-ऑप्टिकल नेटवर्क) असे नाव देण्यात आले आहे. चीनच्या या नव तंत्रज्ञानामुळे इतर देशांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इंटरनेटची वेगवान गती
जगातील पहिल्या 10G क्लाऊड ब्रॉड बँड कम्युनिटीची शांघायमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेला अर्थातच 50G-PON चे पाठबळ आहे. चायना टेलिकॉम शांघाय कंपनी आणि यंगपू डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटमध्ये या सेवेसाठी करार झाला आहे. यामध्ये लायटिंग फास्ट इंटरनेट स्पीड देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांचा डिजिटल अनुभव वृद्धींगत झाला आहे. त्यांना इंटरनेटचा खरा आनंद लुटता येत आहे.
10 गीगाबाईट क्लाऊड ब्रॉडबँडचा अनुभव
यामध्ये युझर्सला 10 गीगाबाईट क्लाऊड ब्रॉडबँडचा अनुभव मिळेल. कंपनीच्या दाव्यानुसार, या गतीने 2 तासांचा 8k व्हिडिओ क्वालिटीचा 90GB चित्रपट जेमतेम 72 सेकंदात डाऊनलोड करता येईल. हा एक विश्वविक्रम ठरणार आहे. हे नवतंत्रज्ञान तुमच्या कामाचा अनुभव समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कामाची पद्धतीत अमुलाग्र बदल होईल. ग्राहकांना अल्ट्रा फास्ट ब्रॉडबँडची गती मिळेल. त्यामुळे ऑनलाईन काम करणे अगदी सोप्पं होईल.
रिअल टाईम डेटा प्रक्रिया
चीनच्या अल्ट्रा फास्ट डेटा हस्तांतरण तंत्रज्ञानामुळे इतर अनेक नवसंशोधनाला बळ मिळेल. तर सध्या ज्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ज्यात स्मार्ट होम तंत्रज्ञानाचा वापर होतो, ते अद्ययावत होईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम डेटा प्रक्रिया, लॅग फ्री कम्युनिकेशनसह 10G नेटवर्क मिळेल. भारतातही 5G चे नेटवर्क नंतर सॅटेलाईट इंटरनेटची चर्चा सुरु आहे. पण चीनने मात्र आघाडी उघडली आहे. भारतात आता 6G ची चर्चा रंगत आहे. पण त्याविषयी कोणतेही धोरण स्पष्ट झालेले नाही.