Apple Event 2021 | आयफोन 12 सिरीजचे 4 फोन लॉन्च; आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5 जी स्मार्टफोन

| Updated on: Apr 20, 2021 | 11:56 PM

'हाय स्पीड' कार्यक्रमात आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स लॉन्च केले. या कार्यक्रमात कंपनीने स्मार्ट होम पॉड स्पीकरसुद्धा बाजारात आणला आहे. (IPhone 12 series 4 phone launch; IPhone 12 Mini The world's thinnest and lightest 5G smartphone; Pre-booking starts from 23rd October)

Apple Event 2021 | आयफोन 12 सिरीजचे 4 फोन लॉन्च; आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5 जी स्मार्टफोन
आयफोन 12 सिरीजचे 4 फोन लॉन्च
Follow us on

नवी दिल्ली : बऱ्याच प्रतिक्षेनंतर अॅपलने अखेर आपल्या आयफोन 12 सिरीज लाँच केले आहे. मंगळवारी रात्री उशिरा कंपनीने कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो स्थित अॅपल मुख्यालयात आयोजित ‘हाय स्पीड’ कार्यक्रमात आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स लॉन्च केले. या कार्यक्रमात कंपनीने स्मार्ट होम पॉड स्पीकरसुद्धा बाजारात आणला आहे. आयफोन 12 मिनी हा जगातील सर्वात पातळ आणि हलका 5G स्मार्टफोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग 23 ऑक्टोबरपासून आयफोन 12 सोबत सुरू होईल. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. (IPhone 12 series 4 phone launch; IPhone 12 Mini The world’s thinnest and lightest 5G smartphone; Pre-booking starts from 23rd October)

आयफोन 12 मालिकेची प्रमुख वैशिष्ट्ये

– अर्ध्या तासासाठी 6 मीटर पाण्यात बुडवून ठेवल्यानंतरही या मालिकेतील सर्व आयफोन्स कार्य करतील.
– आयफोन 12 मालिकेची ड्रॉप परफॉर्मन्स 4 पट चांगली करण्यात आली आहे. म्हणजेच ते आयफोन 11 पेक्षा अधिक मजबूत आहे.
– फोनला मजबूत करण्यासाठी सिरेमिक शील्डचा वापर केला गेला आहे.

आयफोन 12

यात 6.1 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले स्क्रीन आहे. स्क्रीन सेफ्टीसाठी कॉर्निंगला नवीन सिरॅमिक शील्ड आहे. त्याचे रिझोल्युशन 2532×1170 पिक्सेल आहे. यात फ्लॅट अॅल्युमिनियम फ्रेम दिली आहे. आयफोन 11 पेक्षा 11% पातळ, 15% छोटा, 16% हलका असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे फोन ब्लॅक, व्हाईट, ब्लू, रेड आणि ग्रीन या 5 कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

नवीन आयफोन 5 जी कनेक्टिव्हिटीला समर्थन देते. यासाठी कंपनीने आपल्या आयओएसलाही अनुकूलित केले आहे. फोनमध्ये A14 बायोनिक चिप आहे. कंपनीने नुकतीच आयपॅड एअरमध्ये ही चिप वापरली आहे. कंपनीचा असा दावा आहे की नेटवर्कची आयडियल स्थिती असेल तेव्हा याचा सर्वाधिक डाउनलोड स्पीड 4 जीबीपीएस पर्यंत असेल. यात 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळतील.

फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आहे. यामध्ये वाईड लेन्स आणि आणखी दुसरा अल्ट्रा वाईड लेन्सचा समावेश आहे. अल्ट्रा वाईड लेन्स 120 अंशांपर्यंतचा एरिया व्यापतात. आयफोन 11 च्या तुलनेत याची लो लाईट फोटोग्राफीची गुणवत्ता 27 टक्क्यांनी अधिक चांगली आहे. यात नवीन स्मार्ट HDR 3 कॅमेरा फिचर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. हे 15 वॅट्सच्या वायरलेस चार्जिंगला समर्थन देते.

आयफोन 12 ची भारतातील किंमत

आयफोन 12 ची व्हेरिएंटनुसार किंमत मोजावी लागेल. आयफोन 12 64GB स्टोरेजसाठी 79,900 रुपये, 128GB स्टोरेजसाठी 84,900 रुपये, 256GB स्टोरेजसाठी 94,900 रुपये मोजावे लागतील.

आयफोन 12 मिनी

यात 5.4 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 2340×1080 पिक्सेल आहे. यात आयफोन 12 प्रमाणे A14 बायोनिक चिप आहे, जी 5 जी सपोर्टसह येते. यात 12 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिस्प्ले वगळता आयफोन 12 आणि 12 मिनीची दोन्हीचे फिचर्स सारखेच आहेत.

आयफोन 12 मिनीची भारतातील किंमत

आयफोन 12 मिनीसाठी 64GB स्टोरेजसाठी 69,900 रुपये, 128GB स्टोरेजसाठी 74,900 रुपये, 256GB स्टोरेजसाठी 84,900 रुपये किंमत निश्चत करण्यात आली आहे.

आयफोन 12 प्रो

यात 6.1 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी(XDR OLED) डिस्प्ले स्क्रीन असून याचे रिझोल्युशन 2532×1170 पिक्सेल आहे. यात A14 बायोनिक चिप देखील आहे, जी 5 जी सपोर्टसह येते. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये दोन वाईड अँगल सेन्सर आणि एक टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. आपण ते 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता.

कंपनीचे म्हणणे आहे की फोनची बॅटरीसह 17 तासांचे व्हिडिओ कॉलिंग, 11 तासांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग, 65 तास संगीत ऐकू शकता. 20 वॅटच्या अ‍ॅडॉप्टरसह हे 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होते. फोन सिल्व्हर, ग्रेफाईट, गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.

आयफोन 12 प्रो ची भारतातील किंमत

आयफोन 12 प्रो साठी 128GB स्टोरेजसाठी 1,19,900 रुपये, 256GB स्टोरेजसाठी 1,29,900 रुपये, 512GB स्टोरेजसाठी 1,49,900 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

आयफोन 12 प्रो मॅक्स

यात 6.7 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले स्क्रीन असून याचे रिझोल्युशन 2778×1284 पिक्सेल आहे. यात A14 बायोनिक चिप देखील आहे, जी 5 जी सपोर्टसह येते. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये दोन वाईड अँगल सेन्सर आणि एक टेलिफोटो सेन्सर आहे. हे 5 एक्स झूमला समर्थन देते. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. आपण हे 8 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता.

कंपनीचे म्हणणे आहे की फोनच्या बॅटरीसह 20 तासांचे व्हिडिओ कॉलिंग, 12 तासांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग, 80 तास संगीत ऐकू शकता. फोन सिल्व्हर, ग्रेफाईट, गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.

आयफोन 12 प्रो मॅक्सची भारतातील किंमत

आयफोन 12 प्रो मॅक्स खरेदी करायचा असल्यास 128GB स्टोरेजसाठी 1,29,900 रुपये, 256GB स्टोरेजसाठी 1,39,900 रुपये, 512GB स्टोरेजसाठी 1,59,900 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

होम पॉड मिनी लाँच

कार्यक्रमाची सुरुवात होम पॉड मिनी स्पीकरच्या लाँचसह झाली. हा एक स्मार्ट स्पीकर आहे, आयफोनशी कनेक्ट होतो. म्हणजेच, आपण या स्पीकरच्या मदतीने आपला आयफोन ऑपरेट करू शकता. यात टच कंट्रोल देण्यात आले आहे. स्पीकरची साऊंट क्वालिटी सुधारण्यासाठी यात 4 रेंज डायनामिक ड्रायव्हर्स, 360 साऊंड आणि अॅपल एस 5 चिप आहे. हे स्पीकर इंटेलिजंट असिस्टंट वैशिष्ट्याने सुसज्ज आहे. स्पीकर कंपनीच्या सहाय्यक प्रणाली सिरीवर कार्य करते. हे घरातील प्रत्येक सदस्यांचा आवाज ओळखण्यास सक्षम आहे. हा स्पीकर स्मार्ट होम म्हणून वापरला जाऊ शकतो. कंपनीने हे सफेद आणि राखाडी दोन रंगांच्या रूपांमध्ये बाजारात आणले आहे. याची भारतातील किंमत 9,900 रुपये असून प्री-ऑर्डर 6 नोव्हेंबरपासून तर डिलिव्हरी 16 नोव्हेंपासून सुरु होईल. (IPhone 12 series 4 phone launch; IPhone 12 Mini The world’s thinnest and lightest 5G smartphone; Pre-booking starts from 23rd October)

इतर बातम्या

रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी

दररोज 1500 लोकं आपली माणसं गमावताहेत, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर उपाययोजनांची आवश्यकता, अमोल कोल्हे हळहळले