iPhone 16 Sale : कशाला पाय दुखवताय गर्दीत; अवघ्या 10 मिनिटांत आयफोन 16 ची घरपोच डिलिव्हरी, कुठे सुरू झाली सेवा

| Updated on: Sep 20, 2024 | 12:10 PM

iPhone 16 Home Delivery : क्विक कॉमर्सने सध्या बाजाराचे चित्र पालटून टाकले आहे. झटपट घरपोच डिलिव्हरी हे या साईटचे कौशल्य असते. अगदी काही मिनिटात तुम्हाला खरेदीनंतर वस्तू हातात येते. आता आयफोन 16 पण तुम्ही असाच झटपट मिळवू शकता. त्यासाठी लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही.

iPhone 16 Sale : कशाला पाय दुखवताय गर्दीत; अवघ्या 10 मिनिटांत आयफोन 16 ची घरपोच डिलिव्हरी, कुठे सुरू झाली सेवा
आयफोन 16 अवघ्या 10 मिनिटात घरपोच
Follow us on

ॲप्पलने सणाच्या हंगामात धमाका केला आहे. आजपासून देशातील कंपनीच्या स्टोरमध्ये आयफोन 16 ची विक्री सुरू केली आहे. कालपासूनच अनेकांनी स्टोरसमोर ठाण मांडलं आहे. काही जण भल्या पहाटे उठून iPhone 16 खरेदीसाठी धावा धाव करत स्टोरसमोर उभे ठाकले आहे. हा स्मार्टफोन आपलासा करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. पण स्टोरसमोरील लांबच लांब रांगांमुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. त्यांच्यासाठी आता अगदी घरपोच आयफोन 16 मिळण्याची सोय झाली आहे. हे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना अगदी 10 मिनिटात हा स्मार्टफोन घरपोच पोहचवण्याचा दावा करत आहेत.

ब्लिंकिट आणि बिग बास्केटची ऑफर

हे सुद्धा वाचा

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट आणि बिग बास्केट या ई-कॉमर्स कंपन्यांनी ही ऑफर आणली आहे. ग्राहकांची आयफोनची क्रेझ लक्षात घेत या कंपन्या ग्राहकांना अगदी काही मिनिटातच आयफोन घरपोच पोहचत करणार आहेत. या कंपन्यांनी क्विक डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. झोमॅटोची क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट आणि टाटा समूहाची बिग बास्केट या कंपन्यांनी झटपट डिलिव्हरची सोय केली आहे. देशातील अनेक शहरातील ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल. कंपन्यांच्या दाव्यानुसार अवघ्या 10 मिनिटात त्यांच्या घरी आयफोन 16 ची डिलिव्हरी होईल.

या शहरात झाली सुरुवात

बिग बास्केटने 10 मिनिटात आयफोन 16 सेवेची सुरुवात आज शुक्रवारपासून सुरू केली आहे. कंपनीने बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर, मुंबईमध्ये ही सेवा सुरू केली आहे. या शहरातील ग्राहक बिग बास्केटवर आयफोन 16 ची ऑर्डर बुक करू शकतील. त्यांच्या घरी केवळ10 मिनटांमध्ये हा स्मार्टफोन डिलिव्हरी होईल. बिग बास्केटने त्यासाठी टाटा समूहाची इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन क्रोमासोबत भागीदारी केली आहे.


ब्लिंकिट पण नाही मागे

या शर्यतीत ब्लिंकिट पण मागे नाही. ही कंपनी पण अवघ्या 10 मिनिटात आयफोन 16 ची डिलिव्हरी करेल. कंपनीने ग्राहकांना याविषयीचा अलर्ट व्हॉट्सॲपवर पाठवला आहे. ग्राहक बिग बास्केट सारखेच ब्लिंकिटवरून आयफोन 16 ची खरेदी करू शकतील. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर ढींढसा यांनी याविषयीची माहिती एक्सवर दिली आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना 21 सप्टेंबरपासून आयफोन 16 ऑर्डर करु शकतील. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म आयफोन 16 डिलिव्हरी त्या त्या शहरानुसार आणि त्यांच्या सदस्यत्वानुसार करतात.