Apple WWDC 2024 कार्यक्रमात कंपनीने iOS 18 ची घोषणा केली. ही iPhone युझर्ससाठी एक अपकमिंग ऑपरेटिंग सिस्टिम आहे. त्यामुळे आयफोन युझर्सच्या दिमतीला अनेक फीचर्स दिसतील. याशिवाय Apple Intelligence पण बाजारात उतरविण्यात आले आहे. ही एक पर्सनल इंटेलिजन्स सिस्टिम आहे. कंपनीने ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI सोबत करार केला आहे. त्यामुळे ॲप्पलचे व्हाईस असिस्टंट Siri आता विना क्लाऊडच्या मदताने स्वतः छोटी-छोटी कामे करेल.
वैयक्तिक डाटा सुरक्षित
ॲप्पलने या नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. त्यानुसार, सर्व प्रकारच्या डेटावर डिव्हाईसच्या आताच प्रक्रिया करण्यात येईल. iOS 18 मध्ये बिल्ट इन Writing Tools आहे. त्यामुळे पुन्हा एखादा मॅसेज, वाक्य लिहायचे असेल तर ते मदत करते. यामध्ये प्रूफ रीड आणि टेक्स्ट, सारांश रुपात लिहिण्याचा पर्याय मिळतो. ही सुविधा फर्स्ट पार्टी ॲप्स, Mail. Pages, Notes आणि थर्ड पार्टी ॲप्सला सपोर्ट करते.
Image Playbackground
ॲप्पलने Image Playbackground पण समोर आणले आहे. हे एक इमेज जनरेटर आहे. हे फीचर युझर्सला तीन स्टाईलमध्ये प्रतिमा तयार करण्याची सुविधा देते. यामध्ये एक ॲनिमेशन, दुसरे Illustration आणि तिसरे Sketch ची सुविधा देते. हे फीचर एक स्वतंत्र ॲपप्रमाणे असेल.
Photo App झाले अपडेट
ॲप्पलने फोटो ॲपला अपडेट केले आहे. यामध्ये युझर्स साधे विवरण टाईप करुन स्टोरीज तयार करु शकतील. कंपनीच्या दाव्यानुसार, ॲप्पल इंटेलिजन्स तुमची कथा, गोष्टीसाठी चांगले फोटो, व्हिडिओ निवडील आणि त्याआधारे एक व्हिडिओ तयार करेल. Magic Eraser सारखेच युझर्सला हे एक नवीन फीचर मिळेल. त्याच्या मदतीने फोटोमधील गरज नसलेल्या व्यक्ती, घटक सहज बाजूला करता येतील.
जगभरात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सॅमसंगसह इतर अनेक कंपन्यांच्या मोबाईलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या अनेक फीचर्सचा सध्या बोलबाला आहे. पण हे तंत्रज्ञान युझर्सच्या फायद्यासाठी सुरक्षित ठेवण्याची मोठी कसरत कंपन्यांना करावी लागत आहे. या फीचर्सचा गैरवापर झाल्यास ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरफायदा घेण्याची भीती पण वाढली आहे.