नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या शुक्रवारपासून युद्ध (Israel Hamas War) सुरु झाले आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासच्या आगळीकमुळे युद्ध भडकले आहे. सध्या दोन्ही पक्ष आक्रमक आहेत. पण इस्त्राईल हा चिवट देश चिकाटीसाठी, नव तंत्रज्ञानासाठी पण ओळखल्या जातो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे या देशाने अनेक तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्याचा वापर शेतीपासून ते संरक्षणापर्यंत करण्यात येतो. हवेतून पिण्याचे पाणी तयार करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. ठिबंक सिंचन, ड्रीप इरिगेशनच नाही तर अनेक तंत्रज्ञानाने (Innovation Technology) जगाला थक्क करुन सोडले आहे.
सुरक्षित देश म्हणून ओळख
सर्व बाजूंनी शत्रुंनी घेरलेले असतानाही सुरक्षित देश अशी इस्त्राईलची ओळख आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 97 लाख आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण हा देश लहान आहे. पण मेहनतीच्या जोरावर या लोकांनी जगात दबदबा तयार केला आहे. हमास कायम पाचविला पुरलेली असल्याने या देशाला मोठा ताण सहन करावा लागतो. पण तंत्रज्ञानात या देशाने मोठी झेप घेतली आहे.
Watergen : हवेतून पाणी
पिण्याची पाण्याची समस्या जगातील अनेक देशांना भेडसावते. आफ्रिकन खंडात तर ही मोठी समस्या आहे. पण इस्त्राईलच्या Watergen या कंपनीने त्यावर उपाय शोधला. आर्ये कोहावी या कंपनीचे मालक आहेत. हवेतून पाणी तयार करण्याचे तंत्र त्यांनी विकसीत केले आहे. एक युनिट वीजेत हे तंत्रज्ञान चार लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी तयार करते.
Netafim : कमी पाण्यात शेती
मध्यपूर्वेतील या देशात मोठा भाग वाळवंटाचा आहे. या भागात शेती करणे अवघड आहे. पाण्याची समस्या आहे. त्यावर इस्त्राईलच्या तंत्रज्ञानांनी उपाय शोधला. त्यांनी पाण्याच्या कमतरतेतूनच उपाय शोधला. 1965 मध्ये या देशाने जगाला मायक्रो -इरिगेशन सिस्टम Netafim दिले. कमी पाण्यात सिंचनाची व्यवस्था विकसीत केली.
PillCam : शरीरातील कॅमेरा
इस्त्राईलचे शास्त्रज्ञ गेव्हरियल यांना पोटात काही तरी त्रास झाला. त्याचे निदान करण्यासाठी त्यांनी थेट शरीरात जाणारा कॅमेरा तयार केला. आता जगभर त्याचा वापर होतो. त्याआधारे आताड्याच्या समस्या, पचन संस्थेतील समस्या आणि इतर अडचणी समजून घेण्यास मोठी मदत झाली आहे.
SniffPhone : वासातून रोगाची माहिती
SniffPhone उपचार तंत्र आहे. त्यामुळे शारिरीक समस्या सहज समजतात. युरोपियन कमिशनने या नवतंज्ञानाचे कौतुक केले होते. रुग्णाच्या वासाच्या आधारे, त्याच्या गंधावरुन त्याला कोणता आजार झाला आहे. तो कोणत्या समस्येने ग्रस्त आहे, हे समजते. स्मार्टफोनच्या आधारे हे तंत्रज्ञान काम करते.
Firewall : मेलवेअरविरोधातील सक्षम प्रणाली
आता इंटरनेटचा वापर वाढला आहे. सर्वच जण ऑनलाईन असतात. अशावेळी मेलवेअर तुमचा लॅपटॉप, संगणकावर हल्ला करतात. त्याविरोधात फायरवॉल हे तंत्रज्ञान इस्त्राईलच्या चेक पॉईट सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीने तयार केले. 1993 मध्ये हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले होते.