डुअल कॅमेरा, 32 जीबी स्टोरेजसह 5,499 रुपये किंमतीचा दमदार स्मार्टफोन लाँच

| Updated on: Feb 02, 2021 | 8:22 PM

स्मार्टफोन निर्माती कंपनी itel ने नुकताच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. (itel A47 smartphone launched with price of Rs 5499)

डुअल कॅमेरा, 32 जीबी स्टोरेजसह 5,499 रुपये किंमतीचा दमदार स्मार्टफोन लाँच
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी itel ने नुकताच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम लुक आणि HD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी एक्सक्लूझिव्हली Amazon या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध करण्यात आला. हा स्मार्टफोन itel च्या A-सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. itel A47 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. itel A47 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचांची मोठी स्क्रीन आणि सोबतच डुअल सिक्योरिटी फिचर देण्यात आलं आहे. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. (itel A47 smartphone launched with price of Rs 5499, check specification and feature)

itel कंपनी नेहमीच किफायतशीर स्मार्टफोन लाँच करत असते. किफायतशीर स्मार्टफोनच्या बाबतीत itel कंपनी एक स्ट्राँग ब्रँड बनली आहे. 6-7 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आयटेल कंपनीचं वर्चस्व आहे. आयटेलला टक्कर देण्यासाठी इनफिनिक्स, सॅमसंग आणि शाओमीने या प्राईस रेंजमध्ये एक-दोन फोन लाँच केले आहेत. परंतु या रेंजमध्ये आयटेलने आतापर्यंत अनेक फोन लाँच करुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम केलं आहे. कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोनही याच प्राईस रेंजमध्ये आहे. या फोनची किंमत 5,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी 2021 पासून अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर या फोनचा सेल सुरु होणार आहे.

फिचर्स

itel A47 मध्ये 5.5 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 18:9 आणि रेजोल्यूशन 1440X720 इतकं आहे. ईमेज कलरची उत्कृष्ट क्वालिटी आणि उत्तम स्क्रीन डिझाईनसाठी यामध्ये 2.5D ग्लास देण्यात आला आहे. सोबतच डुअल 5MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये सॉफ्ट फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये तुम्हाला स्मार्ट रिकग्निशन, पोट्रेट मोड, ब्युटी मोडसह अनेक इफेक्ट्स मिळतील.

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

जबरदस्त कॅमेरा

सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.

हेही वाचा

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

(itel A47 smartphone launched with price of Rs 5499, check specification and feature)