100 रुपयांपेक्षा कमी दरात फास्ट इंटरनेट देणारे रिचार्ज प्लॅन, सोबत मिळणार ‘हे’ फायदे

| Updated on: Jan 03, 2025 | 6:32 PM

जर तुमचा डेली डेटा लिमिट लवकर संपला असेल तर हे प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. एअरटेल-जिओच्या १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा आणि अनेक फायदे मिळत आहेत.

100 रुपयांपेक्षा कमी दरात फास्ट इंटरनेट देणारे रिचार्ज प्लॅन, सोबत मिळणार हे फायदे
Follow us on

आपल्या देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. प्लॅनच्या किंमतीत अचानक दुप्पट वाढ झाल्याने लोक त्यांचे नंबरही स्विच करत आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वस्त प्लॅन बघत आहे. तसे पाहिले तर टेलिकॉम कंपन्या आपले ग्राहक इकडे तिकडे फिरू नयेत म्हणून आपल्या ग्राहकांची देखभाल करण्यासाठी स्वस्त प्लॅन घेऊन येत असतात. अश्यातच एअरटेल-जिओ सुद्धा त्यांच्या ग्राहकांसाठी एकाच मोडमध्ये दोन्ही कंपन्यांनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे डेटा अँड-ऑन प्लॅन हा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत, ज्यामध्ये युजर्संना अनलिमिटेड इंटरनेटसह अनेक फायदे मिळत आहेत. येथे आम्ही तुम्हाला या योजनांची संपूर्ण माहिती सांगत आहोत.

जिओचा ६९ रुपयांचा प्लॅन

जिओ आपल्या युजर्ससाठी 4 डेटा ॲड-ऑन प्लॅन ऑफर करत आहे, ज्याला डेटा बूस्टर देखील म्हणता येईल. या योजना तुमच्या सक्रिय योजनेशी जोडलेल्या असतात. जेव्हा तुमच्या ॲक्टिव्ह प्लॅनची डेली डेटा लिमिट संपते, तेव्हा हे प्लॅन तुम्हाला अनलिमिटेड डेटा बेनिफिट्स देतात, जिओच्या 4 प्लॅनमध्ये 69 रुपये, 19 रुपये, 139 रुपये आणि 29 रुपयांच्या प्लॅनचा समावेश करण्यात आला आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. जिओच्या या प्लानची वैधता तुमच्या ॲक्टिव्ह प्लॅनवर अवलंबून असते. यामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह प्लॅनमध्ये १ जीबी डेटापासून १२ जीबी डेटापर्यंत ॲड-ऑन करू शकता.

एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्ह रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ॲक्सेस मिळू शकतो. याच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर ते दोन दिवस तुम्हाला वापरता येणार आहे. येत्या दोन दिवसांत तुम्ही नवीन डेटा प्लॅनमध्ये झीवर ऑनलाइन चित्रपट-मालिका आणि गेमिंगचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २० जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या सक्रिय योजनेसह या योजनेचा लाभ घेऊ शकता. या प्लॅन मध्ये तुम्ही डिस्ने हॉटस्टार २ दिवसांसाठी खरेदी करू शकता.