तुमच्याकडे जर Reliance Jio चा नंबर असेल तर तुम्ही कमी किंमतीत अनलिमिटेड 5जी डेटाचा लाभ घेऊ शकता. कंपनी ग्राहकांसाठी जोरदार प्लॅन घेऊन आले आहे. अगदी कमी किंमतीत ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा देण्यात येणार आहे. कमी किंमतीत डेटा ज्यांना हवा आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम जबरदस्त आहे. जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 601 रुपये आहे. तुम्ही हा प्लॅन स्वत:साठी खरेदी करू शकता अथवा तो गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता.
601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा
हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह मिळतो. पण हा प्लॅन खरेदी करण्यासाठी एक अट आहे. काय आहे ती अट? ग्राहकांना 601 रुपयांत वर्षभर अनलिमिटेडा डेटा मिळेल. तुम्हाला कोण-कोणते फायदे मिळतात, या प्लॅनची व्हॅलेडिटी किती आहे? असे अनेक प्रश्न आहेत.
ही आहे अट
या प्लॅनमध्ये 601 रुपयांमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल. पण त्यासाठी तुमच्याकडे अगोदरच जिओचा एखादा रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. पण कोणताही सामान्य प्लॅन नसावा. 601 रुपयांच्य अनलिमिटेड डेटासाठी तुमच्याकडे कमीत कमी 1.5 जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन आवश्यक आहे.
प्लॅन खरेदी केल्यानंतर असा होईल फायदा
601 रुपयांचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला 12 अपग्रेड व्हाऊचर मिळेल. ते तुम्ही एक-एक करुन रिडीम करू शकता. हे व्हाऊचर तुम्हाला माय जिओ ॲपवर दिसेल. व्हाऊचर रिडीम केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा घेता येईल.
एका व्हाऊचरची जास्तीत जास्त व्हॅलिडिटी केवळ 30 दिवसांची आहे. जर एखाद्या बेस प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल तर व्हाऊचर सुद्धा 28 दिवसांसाठी सक्रिय राहील. त्यानंतर तुमचे दुसरे व्हाऊचर सक्रिय करता येईल.