मुंबई : जियो (Jio), एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या देशातील तीन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. वायरलेस सब्सक्रायबर्सबाबत बोलायचे झाल्यास या कंपन्यांचा मार्केट शेयर 90 टक्के इतका आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिन्ही कंपन्या सातत्याने नवनवे आणि किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स सादर करत असतात, सोबत अधिक डेटा, ओटीटी सब्सक्रिप्शन्स आणि इतरही अनेक ऑफर्स देतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, 200 किंवा त्याहून कमी रुपयांच्या रिचार्जमध्ये सर्वाधिक डेटा कोणती कंपनी देते. (Jio vs Airtel vs Vi: Best Prepaid Packs Under Rupees 200)
कमी पैशात अधिक डेटा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रिलायन्स जियोचा (Reliance Jio) पहिला नंबर लागतो. जियो कंपनी 149 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंग प्लॅन देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 24 दिवसांसाठी 24 जीबी डेटा दिला जातो. सोबतच 1 जीबी अतिरिक्त डेटादेखील दिला जातो. यासोबतच तुम्हाला दररोज 100 एसएमएस, जियो अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शनही दिलं जातं.
जियोच्या 199 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजेच कंपनी 199 रुपयांमध्ये तुम्हाला 42 जीबी डेटा देत आहे. सोबतच अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस, जियो अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शनही दिलं जातं
एयरटेल (Airtel) कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले तीन प्लॅन सादर केले आहेत. यापैकी 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएसची सुविधा दिली जाते. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. सोबत मोफत हॅलो ट्युन्स, एयरटेल एक्सट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन दिलं जातं.
एयरटेल कंपनीने 179 रुपयांचा अजून एक प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा, 200 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत मोफत हॅलो ट्युन्स, एयरटेल एक्सट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन दिलं जातं.
199 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस आणि 24 दिवसांची वैधता प्रदान करते. सोबत मोफत हॅलो ट्युन्स, एयरटेल एक्सट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन दिलं जातं.
Vi कंपनी तुम्हाला 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि 18 दिवसांची वैधता प्रदान करते. तर 149 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता प्रदान करते. सोबतच Vi मुव्ही, टीव्ही बेसिकची सुविधा दिली जाते. Vi कंपनी 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांसाठी दररोज 1 जीबी डेटा, 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, Vi मुव्हीची सुविधा प्रदान करते.
भारतात मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत रिलायन्स जिओ अव्वल ठरलाय (Reliance Jio tops mobile internet in India). भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं ही नवी आकडेवारी जाहीर केलीय. ज्यामध्ये रिलायन्स जिओला डाऊनलोडींग स्पीडच्या बाबतीत अव्वल स्थान मिळालं आहे. 4 जी डेटा स्पीडच्या बाबतीत जिओ अव्वल आहे. डाऊनलोडच्या बाबतीत 20.7 MBPSचा सरासरी वेग जिओच्या इंटरनेटला असल्याचं ट्रायनं म्हटलंय. मात्र, डेटा अपलोडच्या बाबतीत वोडाफोननं जिओलाही मागे टाकलंय, आणि अव्वल स्थानावर बाजी मारलीय.
आता तुम्ही म्हणाल, डाऊनलोडींग आणि अपलोडींग स्पीडमध्ये काय फरक? तर डाऊनलोडींग स्पीड म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही इंटरनेटवर पाहता, वा डाऊनलोड करता, त्यावेळी इंटरनेटचा स्पीड किती मिळतोय? एखादी गोष्ट डाऊनलोड व्हायला किती वेळ लागतो? सर्वसामान्य मोबाईल यूजर सर्वाधिक डाऊनलोडच करत असतो. व्हिडीओ पाहणे, एखादी गोष्ट सर्च करणे वा एखादी गोष्ट डाऊनलोड करणं हेच सर्वसामान्य मोबाईल यूजर करत असतो. त्यावेळी त्याला डाऊनलोडींग स्पीडची गरज असते. दुसऱ्या बाजूला जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला इंटरनेटवरुन दुसऱ्याला पाठवायची असते, यूट्यूब वा सोशल साईट्सवर एखादा व्हिडीओ पोस्ट करायचा असतो, वा ई-मेलद्वारे एखादी गोष्ट दुसरीकडे पाठवायची असते, त्यासाठी अपलोडींग स्पीड असणं गरजेचं असतं.
डाऊनलोडच्या बाबतीत जिओचा वेग हा वोडाफोनहून दुपटीहून अधिक आहे. मात्र, अपलोडींच्या बाबतीत वोडाफोननं जिओवर मात केलीय. काहीच दिवसांपूर्वी वोडाफोन आणि आयडीया या 2 मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या एकत्र झाल्या, मात्र ट्रायकडून अद्यापही दोन्ही कंपन्यांचे 4 जी इंटरनेट स्पीडचे आकडे वेगवेगळे दिले जात आहेत (Reliance Jio tops mobile internet in India). ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार वोडाफोनला नोव्हेंबर महिन्यात 9.8 MBPSचा स्पीड मिळाला. तर आयडीया आणि भारती एअरटेलला 8.8 MBPSचा स्पीड मिळाला. जिओ सध्या 3.7 MBPSचा अपलोडींग स्पीड पुरवतोय. या बाबतीत वोडाफोन पुढं असल्याचं आकड्यांवरुन कळतंय.
हेही वाचा
75 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री इंटरनेट आणि SMS, Jio चे चार खास प्लान
आमच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती चोरीला गेलेली नाही; Data Leak प्रकरणी Airtel चं स्पष्टीकरण
(Jio vs Airtel vs Vi: Best Prepaid Packs Under Rupees 200)