मुंबई : टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या यूजर्सच्या सोयीसाठी अनेक प्लान बाजारात आणले आहेत. तसेच जिओ कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक नवीन योजना जोडल्या आहेत. या योजनांमध्ये तुम्हाला अधिक फायदे मिळत आहेत. अशातच कंपनीने आपला सर्वात कमी किमतीचा 199 रुपयांचा पोस्टपेड प्लान संपवला आहे. म्हणजेच, आता Jio वापरकर्त्यांना 199 रुपयांच्या प्लॅनचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जिओचा सर्वात स्वस्त प्लान घ्यायचा असेल, तर तुम्हाला तो 299 रुपयांमध्ये मिळेल. जिओचा हा सर्वात कमी किमतीचा प्लान आहे.
Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने आता 299 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आणला आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 30GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा फायदा मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS चा लाभ मिळतो. यामध्ये युजर्स जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
Jio च्या जुन्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर हा प्लान तुम्हाला फक्त 199 रुपयांमध्ये खूप फायदे देत होता. यामध्ये तुम्हाला 25GB डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत होती. तसंच तुम्ही लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकता होता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस करण्याची सुविधाही मिळाली होती.
तसंच आता कंपनीने प्लॅन वाढवण्यासोबतच फायदेही वाढवले आहेत. आधी तुम्हाला 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 25Gb डेटा मिळत होता. तर आता जिओच्या नवीन प्लॅनमध्ये 30GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये अतिरिक्त 5GB डेटा देण्यासाठी कंपनीने किंमत 100 रुपयांनी वाढवली आहे. मात्र, आता तुम्हाला 199 रुपयांच्या प्लॅनचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्त पोस्टपेड प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये अतिरिक्त खर्च करून 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.