मुंबई : गुगल फोटो (Google Photos) हे Android चं अधिकृत गॅलरी ॲप आहे. ते युजर्सला (User) अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरवतं असतं. या ॲप अंतर्गत वापरकर्ते क्लाउडवर (Google Cloud) फोटो देखील एडिट करू शकतात. विशेष त्यासाठी पद्धत देखील सर्वांना समजेल अशी आहे. तुम्ही पाहू शकतात आणि बॅकअप घेऊ शकतात. याशिवाय गुगलनं (Google) आपल्या ताज्या अपडेटमध्ये अनेक खास फीचर्सही जोडले आहेत. ते जाणून घेण्याआधी थोडी पूर्व कल्पना देतो. आपल्याला मोबाईलमधले आपले खासगी फोटो, व्हिडीओ कुणीही बघू नये अशी इच्छा असते. पण, अनेकदा तसं होत नाही. यासाठी खबरदारी म्हणून ॲपच्या शोधात असतो. पण, आता तुम्हाला तसं करायची गरज नाही. यात गुगलनं एक प्रायव्हसी ऑप्शन जोडला गेला आहे. तो म्हणजे लॉक्ड फोल्डर्स आणि याच्या मदतीनं फोटोसारख्या खाजगी गोष्टी लपवल्या जाऊ शकतात. चला तर सोप्या शब्दात जाणून घ्या…
तुम्हालाही तुमच्या फोटो किंवा व्हिडिओंच्या सुरक्षेची काळजी वाटत असेल. तर आज आम्ही तुम्हाला लॉक केलेले फोल्डर कसे वापरायचे ते सांगत आहोत. यामुळे तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवू शकता. यामुळे फोटो कुणी दुसऱ्यानं बघण्याचा धोका देखील कमी होईल. तसेच तुमचे फोटो आणि व्हिडीओ सुरक्षित देखील राहतील. हे खास फीचर्स काय आहे. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला करता येईल शकतात. ते जाणून घ्या…
अशी अगदी साधी पद्धत आणि वापरण्यासही सोपं आहे.