मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचा विळखा वाढताना दिसून येत आहे. तोंड, पोट, गळा आदी विविध कॅन्सरच्या प्रकारांचे रुग्ण आढळून येत असतात. बदलती जीवनपध्दती, खाण्याच्या चुकीच्या सवयी, फास्टफूडचा (Fast food) अतिवापर अशा विविध कारणांमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता कॉलॉरेक्टल कॅन्सरची व्याप्तीदेखील वाढताना दिसून येत आहे. जाणकारांच्या मते, कॉलॉन व रेक्टल यामध्ये कॅन्सरच्या पेशी अमर्यादपणे वाढत जातात. सुरुवातीला जुलाब, पोटदुखी, पोटाचे विकार आदींच्या माध्यमातून कॉलॉरेक्टल कॅन्सरची (Colorectal Cancer) लक्षणे (Symptoms) दिसून येत असतात. अनेकदा रुग्ण या समस्यांकडे सामान्य असल्याचे सांगत दुर्लक्ष करीत असतात. परंतु नंतर हेच तीव्र रुप धारण करीत असते. बराच वेळाने याची चाचणी केल्यास कर्करोगाचे निदान होत असते. कॅन्सरमध्ये अनेक रुग्ण हे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे साहजिकच नंतर हा आजार वाढत जाउन तीव्र रुप धारण करीत असतो.
कॅन्सरचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बदलती जीवनपध्दती हे होय. जवळपास 80 टक़्के लोकांच्या चुकीच्या खाणपाण सवयी व व्यायामाचा अभाव यामुळे कॅन्सरची शक्यता वाढत असते. कॉलॉरेक्टल कॅन्सर होण्यामागे काही एक ठळक असे कारण नसले तरी कॉलॉरेक्टल कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संभाव्य कारणे पुढील प्रमाणे..
भारताला मधुमेहींची राजधानी म्हटले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेहामुळे अनेक संधीसाधू आजारांना आमंत्रण मिळत असते. त्यामुळे याला आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, मधुमेहींना कॉलॉरेक्टल कॅन्सरचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. मधुमेहींना याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्यांना कॉलॉरेक्टल कॅन्सरपासून वाचण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आदी गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अतिरिक्त मद्यसेवनामुळे कॉलॉरेक्टल कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. मद्यासह ज्या-ज्या पदार्थांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते असे सर्व घटक कॉलॉरेक्टल कॅन्सर होण्याला जबाबदार ठरु शकतात. त्यामुळे मद्याचे सेवन न केलेले बरे असते. शिवाय मद्यसेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार निर्माण होत असतात. कॉलॉरेक्टल कॅन्सरदेखील पोटाच्या विकारांशी संबंधित असल्याने अशा वेळी त्याचा धोका सर्वाधिक असतो. शक्यतो मद्य सोडून देण्याचा प्रयत्न करावा.
जे लोक अतिरिक्त लाल मांसाचा आपल्या आहारात समावेश करतात त्यांनादेखील कॉलॉरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होत असतो. ज्या लोकांना मांसाहार आवडतो त्यांनी लाल मांस सोडून इतर मांसाहाराकडे वळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. लाल मांस हे अतिरिक्त चरबीयुक्त असल्याने त्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याची शक्यता वाढत असते. त्यामुळे लाल मांस आपल्या आहारातून वगळावे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स