नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : Apple iPhone 15 Series लॉंच केल्यानंतर आता आयफोन बनविणाऱ्या Apple कंपनीने काही मॉडेल्सची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुम्हाला या Apple कंपनीचे काही मॉडेल आता या कंपनीच्या शोरुममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. जर तुम्हाला कंपनीचे आधीचे मॉडेल्स आता विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे या मॉडेल्सच्या किंमती कमी होण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. चला आपण पाहुयात कोण कोणत्या मॉडेल्सची विक्री एप्पल कंपनीने आता बंद केली आहे.
आयफोन 15 ची नविन मालिका लॉंच झाल्यानंतर एप्पल कंपनीने आता एप्पलचे iPhone 12, iPhone 13 mini तसेच iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन 14 प्रो मॅक्स गेल्यावर्षी लॉंच झालेल्या आयफोन 14 मालिकेतील सर्वात महागडा फोन होता. या फोनची किंमत 1 लाख 39 हजार 900 रुपयांपासून सुरु होत होती. आता या फोनला कंपनीने तिच्या अधिकृत वेबसाईटवरुन हटविले आहे.
तसेच आयफोन 14 प्रो चे देखील उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनला गेल्या इव्हेंटवेळी 1 लाख 29 हजार 900 रुययांच्या किंमतीला उतरविले होते. आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे दोन फोन मात्र विक्रीसाठी पूर्वीप्रमाणे उपलब्ध असतील.
एप्पल कंपनीने छोट्या आकाराचा आयफोन 13 मिनी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनला ज्या लोकांना मोठ्या फोन ऐवजी लहान फोनमध्ये फ्लॅगशिप फिचर्सचा आनंद घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा फोन लॉंच करण्यात आला होता.
एप्पलने साल 2020 मध्ये लॉंच केलेल्या आयफोन 12 च्या मॉडेल देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनच्या 128 जीबी स्टोअरेज मॉडेलला 59,900 रुपयांत बाजारात उतरविले होते.
एप्पलने या चार मॉडेल्सना आपल्या अधिकृत साईटवरुन जरी हटविले असले तरी तुम्हाला या मॉडेल्सना विकत घ्यायचे असेल तर ई – कॉमर्स साईट्सवर विकत घेऊ शकता. एमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच तुमचे आवडते मॉडेल खरेदी करु शकता.