नवी दिल्ली : Lava या कंपनाने लष्करी दर्जाचा गोरिला ग्लास 3 असणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याचं ठरवलंय. त्याची किंमत फक्त 5 हजार 499 रुपये इतकी आहे. येत्या 22 जानेवारी रोजी LAVA चा हा फोन लॉन्च होणार आहे. (Lava launch Z1 Smartphone RS 5499)
Lava चा नवा स्मार्टफोन अलीकडेच लाँच केलेल्या लावाच्या नवीन लाइनअपचा एक भाग आहे. ज्यामध्ये Z2, Z4 आणि Z6 स्मार्टफोन देखील आहेत. ज्यात सर्व गोरिल्ला ग्लास 3 आहेत.
Lava झेड1 हा एंट्री लेव्हल फोन आहे. ज्याची फक्त 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज आहे. या फोनची भारतात किंमत 5,499 रुपये आहे. हा फोन 26 जानेवारीपासून Amazon वरुन खरेदी करता येईल.
खरं तर गोरिला ग्लास (स्क्रीन) 3 2013 मध्येच लाँच केला गेला होता. आता असा दावा केला जात आहे की तो एक उच्च नुकसान प्रतिरोधक ग्लास आहे म्हणजेच याच स्क्रीनला नुकसान होण्याचा धोका कमी आहे. कंपनीचा असा दावा आहे की जेव्हा इतर उत्पादकांकडून स्पर्धात्मक अल्युमिनोसिलिकेट ग्लासेसची तुलना केली जाते तेव्हा स्क्रॅच रेझिस्टन्समध्ये 4X पर्यंत सुधारणा केली आहे.
“नजीकच्या भविष्यकाळात सुमारे 400 दशलक्ष भारतीय ग्राहक फिचर फोनवरून स्मार्टफोनमध्ये बदलण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षात, हे लक्षात आले आहे की स्मार्टफोन दररोजच्या जगण्याचे मुख्य साधन आहे, असं गोरिला ग्लासचे जनरल मॅनेजर डॉ. अमिन म्हणाले.
ग्राहकांच्या खास आग्रहास्तव गोरिला ग्लासची कंपनाने तरतूद केली आहे. आमच्या नवीन भागीदारीच्या भविष्यासाठी आणि भारतीय बाजारात दिवसेंदिवस आमची विक्री वाढण्यासाठी या फोनच्या निमित्ताने ही नवीन संधी आहे, असंही डॉ. अमिन म्हणाले.
हे ही वाचा :
.4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…