WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करणं काही मिनिटात शक्य, कसं ते जाणून घ्या

| Updated on: Feb 17, 2023 | 7:25 PM

WhatsApp Video Call Recording : अँड्रॉईड आणि आयफोन युजर्स व्हॉट्सअॅप येणारा व्हिडीओ कॉलही रेकॉर्ड करू शकतात. तसेच व्हिडीओ क्लिप सेव्ह करून आठवण म्हणून ठेवू शकता. जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करणं काही मिनिटात शक्य, कसं ते जाणून घ्या
WhatsApp व्हिडीओ कॉलही करता येतो रेकॉर्ड, यासाठी फक्त करावं लागणार हे काम
Image Credit source: Unsplash
Follow us on

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. इतकंच काय तर लोकं आता सहजतेने व्हॉट्सअ‍ॅप करतो असं बोलून जातात. या माध्यमातून फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आणि मेसेज पाठवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये या अॅपची क्रेझ आहे. व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता कंपनीने अनेक फीचर्स युजर्संना दिले आहेत. मात्र असं असलं तरी कॉल आणि व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंगची कोणतीही सुविधा नाही. पण तु्म्ही व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी ही आयडियाची कल्पना वापरावी लागेल.अँड्रॉईड युजर्स XRecorder अ‍ॅपच्या मदतीने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकतात. हे अ‍ॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर सहज मिळेल.हे अ‍ॅप तु्म्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.आयफोन युजर्स XRecorder अ‍ॅप देखील वापरू शकतात. पण आयफोन युजर्संना हे अ‍ॅप वापरण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल सहजपणे रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

अँड्रॉईडवर असं डाऊनलोड करा अ‍ॅप

  • गुगलवरून सर्वात आधी XRecorder हे अ‍ॅप डाउनलोड करा
  • अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर काही परमिशन मागितली जाईल. ती एक्सेप्ट करा आणि इंस्टॉल करा.
  • इंस्टॉल केल्यानंतर अ‍ॅपचं रेकॉर्डिंग सिम्बॉल स्क्रिनवर दिसेल.
  • आता तुम्ही इनकमिंग आणि आउटगोईंग व्हिडीओ कॉल सहज रेकॉर्ड करू शकता.
  • फोनमध्ये एक स्क्रिन रेकॉर्डिंग पर्याय ही मिळेल.या माध्यमातून तुम्ही स्क्रिन रेकॉर्ड करू शकता.

आयफोनवर कसं कराल व्हिडीओ कॉल रेकॉर्ड

  • व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडीओ कॉल करा.
  • व्हिडीओ कॉल केल्यानंतर फोन स्क्रिनवर बॉटमकडून वरच्या दिशेन स्वाइप करा.
  • तिथे तुम्हाला स्क्रिन रेकॉर्डिंगचं ऑप्शन मिळेल.
  • जर ऑप्शन नाही मिळालं तर फोन सेटिंगमध्ये जाऊन कंट्रोल सेंटरवर जा.
  • सेटिंगमध्ये जाऊन कंट्रोल सेटिंवर गेल्यावर तिथे स्क्रिन रेकॉर्डिंगचा पर्याय इनेबल करा.
  • यानंतर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग होण्यास सुरुवात होईल.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स

व्हॉट्सअ‍ॅप हे 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 2.24 बिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर 2016 ते 2020 या कालावधीत 1 बिलियन युजर्स जॉईन झाले. 100 बिलियन मेसेज दिवसाला फॉरवर्ड आणि रिसिव्ह केले जातात. जगभराच्या आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 487.5 मिलियन व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहेत.

Disclaimer : TV9 कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपचा प्रचार करत नाही. तुम्ही Google Play Store वरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घ्या.