4GB/64GB, 5000mAh बॅटरी, 11 हजारांच्या रेंजमध्ये लेनोव्होचा शानदार स्मार्टफोन लाँच

| Updated on: Feb 15, 2022 | 12:49 PM

भारतीय मोबाइल बाजारात लेनोव्होने (Lenovo) नवी स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचं नाव लेनोव्हो K14 प्लस (Lenovo K14 Plus) असे आहे. 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत (Affordable Smartphone) हा फोन सादर करण्यात आला आहे.

4GB/64GB, 5000mAh बॅटरी, 11 हजारांच्या रेंजमध्ये लेनोव्होचा शानदार स्मार्टफोन लाँच
Lenovo K14 Plus
Follow us on

मुंबई : भारतीय मोबाइल बाजारात लेनोव्होने (Lenovo) नवी स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचं नाव लेनोव्हो K14 प्लस (Lenovo K14 Plus) असे आहे. 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत (Affordable Smartphone) हा फोन सादर करण्यात आला आहे. हा मोबाईल नुकताच रशियात लॉन्च झाला आहे. त्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.5 इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz चा आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंगमध्ये मदत करतो. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल आहे.

Lenovo K14 Plus च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन RUB 11490 (जवळपास 11400 रुपये) या किंमतीसह लाँच करण्यात आला आहे. या किंमतीत 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. लेनोव्होचा हा स्मार्टफोन Beige आणि Black या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Lenovo K14 Plus चे स्पेसिफिकेशन्स

लेनोवोचा हा स्मार्टफोन Moto E40 चं रीब्रँडेड व्हर्जन आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये एकच चिपसेट वापरण्यात आला आहे. या लेनोवो फोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या IPS पॅनलमध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. Moto E40 भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. भारतात हा मोबाइल फोन Redmi, Realme, Infinix आणि Samsung सारख्या ब्रँडशी स्पर्धा करेल. मोटोरोला लेनोवोच्या मालकीची आहे.

Lenovo K14 Plus चा प्रोसेसर

Lenovo K14 Plus मध्ये Unisoc T700 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो Mali G52 GPU वर काम करतो. या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. त्यात एसडी कार्ड इन्सर्ट करण्यासाठी डेडीटेकेड स्टॉट देण्यात आला आहे.

Lenovo K14 Plus चा कॅमेरा सेटअप

Lenovo K14 Plus च्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.79 अपर्चरसह येतो. यातील इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत, जे मॅक्रो आणि अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतात. तसेच, या लेनोवो फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील उपयुक्त आहे.

इतर बातम्या

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, फोनमध्ये काय असेल खास?

Electric And Hybrid Vehicles : इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या मागणीत वाढ, डेलॉइटच्या अहवालातून माहिती समोर

OnePlus Nord CE 2 5G हा मोबाईल 17 फेब्रुवारीला होणार लाँच, जाणून घ्या महत्त्वाचे फीचर्स