FB वर टाईमपास किती केला? स्वत: फेसबुक सांगणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : सध्या फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेट स्वस्त झाल्यापासून फेसबुक यूजर्सची संख्याही वाढली आहे.  लोक सोशल मीडियावर आपला जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. पण दिवसाला आपण किती वेळ सोशल मीडियावर घालवतो याचा अंदाजही आपल्याला कधी आला नसेल. मात्र आता स्वत: फेसबुकच तुम्हाला तुम्ही किती वेळ फेसबुक वापरला, याबाबतची माहिती देणार आहे.  फेसबुक […]

FB वर टाईमपास किती केला? स्वत: फेसबुक सांगणार!
Follow us on

मुंबई : सध्या फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेट स्वस्त झाल्यापासून फेसबुक यूजर्सची संख्याही वाढली आहे.  लोक सोशल मीडियावर आपला जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. पण दिवसाला आपण किती वेळ सोशल मीडियावर घालवतो याचा अंदाजही आपल्याला कधी आला नसेल. मात्र आता स्वत: फेसबुकच तुम्हाला तुम्ही किती वेळ फेसबुक वापरला, याबाबतची माहिती देणार आहे.  फेसबुक नुकतंच एक फीचर  लाँच केलं आहे. ‘Your Time on Facebook’ नावाने हे फीचर उपलब्ध आहे. अशाप्रकारचं फीचर आणण्याची घोषणा फेसबुकने ऑगस्ट महिन्यात केली होती. 

 या फीचरचा वापर कसा करावा?

 फेसबुक, इंस्टाग्रामवर आपण किती वेळ घालवतो हे जाणून घ्यायचे असेल, तर फेसबुकच्या वेबसाईट किंवा अॅपवर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर सेटिंग आणि प्रायव्हसी सेटिंगवर क्लिक करा, तुम्हाला स्क्रिनवर ‘Your Time on Facebook’ नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कितीवेळ घालवता हे दिसून येईल. जर तुम्ही फेसबुक अॅडिक्ट अर्थात फेसबुकचं व्यसन लागलं असेल, तर काही ठाराविक वेळेनंतर तुम्हाला फेसबुककडून नोटीफिकेशन्सही येईल.

 

 

आधी फेसबुककडून या फीचर्सची संपूर्ण पडताळणी करण्यात आली, त्यानंतर हे फीचर युजर्ससाठी लाँच करण्यात आले. मागील आठवड्यात इंस्टाग्रामलाही हे फीचर आले आहे. इंस्टाग्रामला याचे नाव ‘Your Activity’  असे आहे.