मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा (Covid-19) केवळ जगभरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. लाखो लोकांनी त्यांच्या नोकर्या गमावल्या आहेत, तर बऱ्याच कंपन्या आता आपल्या कर्मचार्यांसमवेत घरून काम करत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरही कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढता आलेले नाही. नोकरी गमावलेले लोक नवीन नोकर्या शोधत असतात. अशा परिस्थितीत, सर्वजण वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाऊन नोकरी शोधत आहेत, परंतु त्यापैकी बरेच जण फसवणूकीलाही बळी पडत आहेत. Linkedin युजर्ससोबतही असेच घडत आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) इंटरनेटवरुन नोकरी शोधणाऱ्यांच्या मागावर आहेत. Linkedin किंवा तत्सम वेबसाईटवरुन नोकरी शोधणारे अनेक युजर्स सायबर गुन्हेगारांचा बळी ठरत आहेत. (LinkedIn fraud job offer Cyber Criminals infect phone and computers)
eSentire सिक्युरिटी फर्मच्या म्हणण्यानुसार, सायबर अॅटेकर्सच्या ग्रुपने नोकरीच्या शोधात असलेल्या युजर्सना लक्ष्य करण्याचे काम सुरू केले आहे. गुल्डन चिकन्स असे या ग्रुपचे नाव आहे, या ग्रुपने युजर्सची दिशाभूल करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ते युजर्सना त्यांच्या डिव्हाइसवर नोकरी देण्यासंदर्भातील लिंक पाठवतात आणि नंतर त्यांची फसवणूक करतात. eSentire च्या अहवालात असे म्हटले आहे की, हा ग्रुप युजर्सना त्यांनी गमावलेल्या नोकरीसारखीच दुसरी नोकरी, किंवा ते सध्या करत आहेत, अशीच नोकरी आणि तितकाच पगार ऑफर करतात.
eSentire च्या रिसर्च टीमने असे म्हटले आहे की, जर एखादा LinkedIn मेंबर एखाद्या मोठ्या पोस्टवर कार्यरत असेल किंवा आधी होता, त्या युजरला त्याच पोस्टची लिंक पाठवली जाते. युजर जेव्हा त्या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा एक व्हायरस त्याच्या डिव्हाइसमध्ये पाठवला जातो. तो व्हायरस युजरच्या बँकिंग तपशीलांसह त्याची वैयक्तिक माहिती चोरतो. eSentire चे वरिष्ठ संचालक Rob Mcleod म्हणाले की, कोरोनामुळे बर्याच लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आत्ता नोकरीची गरज आहे, यामुळे लोक सहजपणे या जाळ्यात अडकतात.
या प्रकरणावर Linkedin ने म्हटले आहे की, संबंधित फेक अकाउंट्स शोधण्याचं काम मॅन्युअली सुरु केलं आहे. सदर अकाऊंट्स कायमस्वरुपी ब्लॉक केले जातील. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक नोकरी शोधतात. अशा परिस्थितीत आपणही लक्ष देणे आवश्यक आहे की, आपण ज्याच्याशी गप्पा मारत आहात किंवा जी प्रोफाइल तुम्ही ओपन केली आहे ती ओरिजिनल आहे की फेक, ही बाब तपासायला हवी.
इतर बातम्या
(LinkedIn fraud job offer Cyber Criminals infect phone and computers)