मुंबई : सॅमसंगने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन Galaxy S10 सीरिजचा फोन लाँच केला आहे. यावेळी सॅनसंगने Galaxy S10 आणि S10+ च्या व्यतिरीक्त S10e आणि Galaxy Fold स्मार्टफोनही लाँच केला आहे. गॅलेक्सी फोल्ड कंपनीचा नवीन प्रिमीयम स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी फोल्डची किंमतही जास्त आहे. Galaxy S10 आणि S10+ हाय अँड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये नवीन Infinity-O डिस्प्ले दिला आहे.
या नवीन स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-शॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, रिव्हर्स व्हायरलेस चार्जिंग आणि Exynos 9820 या चिपसेटचा समावेश आहे. तसेच Galaxy S10 एक छोटा व्हेरिअंट आहे आणि या फोनला अॅपलच्या लाईनअपमध्ये iPhone XR सारखे समजले जाते.
दोन्ही फोनमध्ये कर्व AMOLED Infinity-O डिस्प्ले दिला आहे. तसेच यांच्या रिअर पॅनलमध्ये गोरिल्ला ग्लास 6 चा समावेश आहे. S10 मध्ये 6.1 इंचाचा QHD+ (3040×1440) डिस्प्ले आणि Plus मध्ये 6.4 इंचाचा QHD+ (3040×1440) डिस्प्ले दिला आहे. दोघांचा रेशओ 19.9 आहे.
दोन्ही फोनमध्ये काही ठिकाणी 7nm ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर (2.8GHz+2.4GHz+1.7GHz) आणि भारताततील ठिकाणी 8nm ऑक्टा-कोअर सॅमसंग Exynos 9820 प्रोसेसर (2.7GHz+2.3GHz+1.9GHz) आहे.
Galaxy S10 आणि S10+ स्पेसिफिकेशन्स