मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह गोपनीयता धोरण (Privacy policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. (Mark Zuckerberg defends WhatsApp privacy policy amid India backlash)
अनेक युजर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी WhatsApp वर टीका करु लागले. त्यानंतर WhatsApp ने त्यांचा प्रायव्हसी अपडेट प्लॅन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जगभरातील कोट्यवधी युजर्सच्या विरोधानंतरही WhatsApp ची मालकी असलेली कंपनी फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने WhatsApp च्या नव्या Privacy policy चं समर्थन केलं आहे. मार्क झुकरबर्ग म्हणाला की, “नवीन अपडेटमध्ये तुमचे तुमच्या कुटुंबियांचे, मित्रांच्या मेसेजेसच्या प्रायव्हसीशी छेडछाड केली जाणार नाही. तसेच आम्ही ही पॉलिसी मागे घेतलेली नाही, केवळ 15 मेपर्यंत पुढे ढकलली आहे. जेणेकरुन आम्ही या नव्या धोरणाबाबत लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करु शकू. युजर्सना नव्या पॉलिसीची नीट माहिती पोहोवता यावी, यासाठी आम्ही हे अपडेट पुढे ढकललं आहे.”
युजर्सना दिलासा देत झुकरबर्ग म्हणाला की, “WhatsApp वरील सर्व मेसेजे हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. म्हणजेच तुम्ही काय बोलत आहात, कोणता डेटा एकमेकांसोबत शेअर करत आहात तो आम्ही पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही. तसेच भविष्यातदेखील आम्ही ते करु शकत नाही. आम्ही एक नवं बिझनेस टूल विकसित करत आहोत जेणेकरुन आमच्या सुरक्षित होस्टिंग इंफ्रास्ट्रक्चरचा वापर करुन बिझनेस स्टोर WhatsApp चॅट मॅनेज करु शकतील. परंतु हे केवळ युजर्सच्या मर्जीनेच होईल. हे सगळं करण्यासाठी तसेच आमच्या सेवेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे.”
युझर्सना धोरणं समजण्यासाठी अधिक वेळ
8 फेब्रुवारीला कोणाचंही व्हॉट्सअॅप अकाऊण्ट डिलीट केलं जाणार नाही. गोपनीयता आणि सुरक्षेबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 15 मे रोजी नवे बिझनेस ऑप्शन्स खुले होण्याआधी युझर्सना आमची धोरणं समजून देण्यासाठी अवकाश देत आहोत, असं व्हॉट्सअॅपने पुन्हा स्पष्ट केलं.
सिग्नलने ‘सिग्नल’ ओळखला
व्हॉट्सअॅपवरील डेटा पूर्वीपासूनच फेसबुकसोबत शेअर केला जात होता. परंतु, WhatsApp वरील जवळपास सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाण्याच्या संभ्रमामुळे युझर्समध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या स्पर्धकांकडे अनेक युझर्स वळले. (WhatsApp delays implementation of new privacy policy)
व्हॉट्सअॅपचे स्पष्टीकरण
“तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेला (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही” असं व्हॉट्सअॅपने त्यांच्या नवीन निवेदनात स्पष्ट केलं होतं. “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युझरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.” असंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा
नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अॅप कायमस्वरुपी बॅन
तब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा
(Mark Zuckerberg defends WhatsApp privacy policy amid India backlash)