नवी दिल्ली : मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. मनुष्य मंगळावर जाण्याची आशा उंचावली आहे. मंगळावर कार्बन डाइऑक्साइडच्या मदतीनेऑक्सीजन निर्मिती करण्यात वैज्ञानिकांना मोठं यश आले आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास मंगळावर वास्तव्य करण्याचा मानवाचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. नासाने(National Aeronautics and Space Administration) मंगळावर ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
नासाच्या वैज्ञानिकांनी पर्सीवरेंस रोवर (Perseverance Rover) या यानासह एक विशिष्ट प्रकारचे डिव्हाईस तयार केले आहे. हे डिव्हाईस मंगळावर ऑक्सिजन तयार करण्यात यशस्वी ठरले आहे. शास्त्रज्ञांनी या डिव्हाईसला Moxie असे नाव दिले आहे.
NASA च्या Perseverance Rover मध्ये Moxie नावाचे हे उपकरण फिट करण्यात आले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने मंगळावर असलेल्या कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन तयार करण्यास मदत होत आहे. टिफिन बॉक्सच्या आकाराचे हे छोटेसे डिव्हाईस आहे. या डिव्हाईसच्या मदतीने एका तासात 6 ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती होते.
प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या छोट्याशा डिव्हाईसचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याची नवीन आवृत्ती या लहान उपकरणापेक्षा कित्येक पटींनी मोठी असेल. या मोठ्या डिव्हाईसच्या मदतीने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य होणार आहे. हे डिव्हाईस कोणत्याही वातावरणात ऑक्सिजन तयार करू शकते.
या डिव्हाईसमुळे मानवाची मंगळावर जाण्याची आशा उंचावली आहे. मनुष्याला श्वास घेण्यासाठी अर्थात जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध झाल्यास लवकरच मनुष्याची मंगळवर राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
A breath of fresh air…11 of them in fact. The MOXIE technology demonstration on @NASAPersevere has completed 11 oxygen generation runs, testing a method that could be used for propellant and for breathing in future crewed Mars exploration missions. More: https://t.co/2bTCig0PF4 pic.twitter.com/ssS6uo8cX8
— NASA Mars (@NASAMars) September 2, 2022