जूनमध्ये 7 सीटर वॅगन आर कारचं लाँचिंग, पाहा किंमत…

| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : मारुती सुझुकी ‘वॅगन आर’चे नवीन व्हर्जन लाँच करत आहे. नवीन वॅगन आरमध्ये सातजण बसू शकतील. ही नवीन कार जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी ही कार नेक्सा डीलरशिपच्या माध्यमातून लाँच करणार आहे. Renault Triber MPV आणि Datsun Go+ MPV ला टक्कर देण्यासाठी कंपनीने ही कार लाँच केली आहे. “मारुतीच्या सेलमध्ये सतत घट होत […]

जूनमध्ये 7 सीटर वॅगन आर कारचं लाँचिंग, पाहा किंमत...
Follow us on

मुंबई : मारुती सुझुकी ‘वॅगन आर’चे नवीन व्हर्जन लाँच करत आहे. नवीन वॅगन आरमध्ये सातजण बसू शकतील. ही नवीन कार जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी ही कार नेक्सा डीलरशिपच्या माध्यमातून लाँच करणार आहे. Renault Triber MPV आणि Datsun Go+ MPV ला टक्कर देण्यासाठी कंपनीने ही कार लाँच केली आहे.

“मारुतीच्या सेलमध्ये सतत घट होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना अप्रतिम अशी कार देणे गरेजेचे आहे”, असं कंपनीचे अधिकारी म्हणाले. वॅगन आरमध्ये प्रिमियम फीचरही दिले आहेत. कारमधील नवीन फीचर ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतील. तसेच कारचे मायलेज आणि किंमतही ग्राहकांना परवडेल, असंही कंपनीने म्हटलं आहे.

1 लीटर इंजिन व्हेरिअंटमध्ये नवीन वॅगन आरची किंमत 4.19 लाख रुपये ते 5.16 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच 1.2 लीटर व्हेरिअंटमध्ये या कारची किंमत 4.89 लाख रुपये ते 5.69 लाख रुपयापर्यंत आहे. 1 लीटर इंजिनसोबत या कारचे आणखी तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत.

नवीन वॅगन आरला हार्टटेक प्लॅटफॉर्मवर विकसीत आणि तयार करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म सेफ्टी नियमांना अनुरुप आहे. नव्या कारमध्ये बोल्ड डिझाईन, मोठी जागा, आरामदायक अशी आहे. सात सीटरमुळे कारला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इंजिन

या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर लावले आहेत. यामुळे 82 Bhp पावर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट होऊ शकतो. या कारचे आणखी काही फीचर खास असू शकतात. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स आहे. या कारला हायब्रिड आणि भविष्यात ईवी पावरट्रेनसह लाँच केले जाऊ शकते.