नवी दिल्ली : एक्सआर तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये भारताच्या योगदानाला गती देण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत मेटा फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (फिक्की)ला एक्सआर ओपन सोर्स (एक्सआरओएस) फेलोशिप उपक्रमासाठी १ दशलक्ष डॉलर्ससह साह्य करत करत आहे. फिक्कीद्वारे चालवले जाणारे एक्सआरओएस एक्सआर (एक्स्टेण्डेड रिअॅलिटी) तंत्रज्ञानावर काम करणार्या १०० भारतीय विकासकांना फेलोशिप प्रदान करून समर्थन देईल, ज्यात स्टायपेंड (वेतन) आणि मार्गदर्शन समाविष्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (एमईआयटीवाय)चा उपक्रम नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन या उपक्रमाचा टेक्निकल भागीदार असेल.
हा उपक्रम विकासकांना एक्सआर तंत्रज्ञानाशी संबंधित ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देण्यासाठी पाठिंबा देईल आणि पुढे भारतीय भाषांमध्ये परवडणाऱ्या, योग्य व स्थानिकीकृत अशा भारतातील विशिष्ट उपायांचा पाया रचेल. एक्सआरओएस उपक्रम हा मेटाच्या जागतिक एक्सआर प्रोग्राम्स अॅण्ड रिसर्च फंडचा भाग आहे, ज्याअंतर्गत कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला एमईआयटीवाय स्टार्टअप हबसह एक्सआर स्टार्टअप उपक्रमासाठी २ दशलक्ष डॉलर्स निधीची घोषणा केली. एक्सआरओएसचा विकासकांना डिजिटल पब्लिक गूड्स तयार करण्यासाठी आणि एक्सआर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संभाव्य रोजगार संधी निर्माण करण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्याचा मनसुबा आहे.
या उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त करत मेटाचे ग्लोबल अफेअर्सचे अध्यक्ष निक क्लेग म्हणाले, “मेटाव्हर्स फक्त एकाच कंपनीकडून निर्माण केले जाणार नाही. एक्सआर ओपन सोर्स सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही या उत्साहवर्धक तंत्रज्ञानांवर काम करणाऱ्या भारतीय विकासकांना पाठिंबा देऊ. त्यांचे कौशल्य, माहिती व प्रयत्नासह आम्ही आशा करतो की इंटरनेट तंत्रज्ञानांची भावी पिढी खुल्या, सहयोगात्मक व उपलब्ध होण्याजोग्या पद्धतीने निर्माण केली जाईल.’’
या उपक्रमाच्या लाँचप्रसंगी उपस्थित भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद म्हणाले, “भारताच्या टेकएडप्रतीचा दृष्टिकोन द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील तरूण विकासक व स्टार्ट-अप्स मेटाव्हर्समधील एक्सआर सारखे भावी तंत्रज्ञान सक्षम करण्याप्रती योगदान देतील तेव्हाच साध्य होऊ शकतो. मला फिक्की व मेटा हा उपक्रम सुरू करत असल्याचा आनंद होत आहे, जो विकासकांना आर्थिक चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबत त्यांना इमर्सिव्ह तंत्रज्ञान तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शनासह पाठिंबा देखील देईल.”
या उपक्रमासाठी सहयोगाबाबत बोलताना एनईजीडीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग म्हणाले, “ओपन सोर्स टेक्नॉलॉजी संचालित इकोसिस्टिम्स मजबूत डिजिटल सार्वजनिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात, जी इंटरऑपरेबल आहेत आणि फेडरेटेड आर्किटेक्चरचे पालन करतात. विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील भारतीय विकासक उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भारत व जगासाठी मेटाव्हर्सचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. एक्सआरओएस उपक्रमाला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे आणि आशा आहे की, हा उपक्रम भारतातील इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी डेव्हलपर इकोसिस्टिम व ओपन सोर्स समुदायाचे पालनपोषण करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. या दशकाला भारताचे टेकएड बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.’’
या उपक्रमाचे महत्त्व सांगत फिक्की कमिटी सदस्य आणि सिंदीकटत रिन्यूएबल एनर्जीचे भारतातील कंट्री हेड डेव्हिन नारंग म्हणाले, “एक्सआरओएस फेलोशिप प्रोग्राम हा भारतीय विकासकांना एक्स्टेण्डेड रिअॅलिटी (एक्सआर) तंत्रज्ञानाशी संबंधित ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या उद्देशाने अद्वितीयरित्या क्युरेट केलेला उपक्रम आहे. २०२५ पर्यंत भारताला एक ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेच्या अनुषंगाने भविष्यातील तंत्रज्ञानातील गुंतवणूकीच्या वाढीला चालना देण्यासाठी हा उपक्रम आवश्यक चालना देईल. या उपक्रमाशी सहयोग केल्याबद्दल आम्ही मेटा आणि एनईजीडीचे आभार मानतो.’’
एक्सआर ओपन सोर्स प्रोग्राम हा भारतातील दुसरा उपक्रम आहे, ज्याद्वारे मेटाचा इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या संदर्भात विकासक इकोसिस्टिमला चालना देण्याचा मनसुबा आहे आणि ते मेटाव्हर्स तयार करण्यासाठी ओपन इकोसिस्टिमला पुढे नेतील. अगदी सुरुवातीपासूनच मेटाने नो लँग्वेज लेफ्ट बिहाइंड (एनएलएलबी) या २५ भारतीय भाषांसह २०० कमी संसाधन भाषांना समर्थन देणारे एकल बहुभाषिक एआय मॉडेल सारख्या विविध ओपन सोर्स उपक्रमांना समर्थन दिले आहे आणि लाँच केले आहे.
गेल्या वर्षी मेटाने पुढील ३ वर्षांमध्ये १० दशलक्षहून अधिक विद्यार्थी व १ दशलक्ष शिक्षकांना इमर्सिव तंत्रज्ञान देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) सोबत भागीदारी केली. सीबीएसईसोबतच्या भागीदारीमधून मेटाची भारताप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते, तसेच एसटीईएम शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या संयुक्त महत्त्वाकांक्षेला प्रतिबिंबित करते आणि भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सामग्रीचा समान प्रवेश मिळण्याची खात्री करून देते, ज्यामुळे ते डिजिटली सक्षम अर्थव्यवस्थेत फ्यूचर ऑफ वर्कसाठी सुसज्ज असतील.
जून २०२२ मध्ये मेटाने एआरमध्ये ४०,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी लर्न प्रोग्राम (LeARn Program) लाँच केला आणि स्कूल ऑफ एआर विकसित केले, जो प्रमुख उपक्रम आहे आणि या उपक्रमाने १,००० विकासकांना मेटास्पार्कमधील प्रगत क्षमतांवर काम करण्यासाठी कुशल बनवले. मेटाचा एक्सआर प्रोग्राम्स अॅण्ड रिसर्च फंड उद्योग सहयोगी, नागरी अधिकार समूह, सरकार, ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था आणि शैक्षणिक संस्थांसोबतची प्रोग्राम्स व एक्स्टेण्डेड रिसर्चमधील दोन वर्षांची ५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक ( two-year $50 million investment) आहे.