मुंबई : शाओमीच्या चाहत्यांसाठी 29 मार्च हा मोठा दिवस ठरणार आहे. आपली नवीन Mi 11 सिरीज लॉन्च करण्याव्यतिरिक्त, चीनी स्मार्टफोन निर्माता आपला नवीन फिटनेस ट्रॅकर, नवीन एमआय स्मार्ट बँड 6 देखील सादर करीत आहे. (Mi Band 6 launching today with 30 sports Mode and at a very low price)
Mi स्मार्ट बँड 6 शाओमीच्या ट्विटर आणि वीबो या दोन्ही चॅनेलवर टीझ केले गेले आहे. फोटोंमध्ये असे दिसून येत आहे की, या स्मार्ट बँडचं डिझाइन Mi बँड 5 प्रमाणेच असेल. तसेच यामध्ये रबर स्ट्रॅप मिळेल. तसेच Mi स्मार्ट बँड 6 मध्ये Mi स्मार्ट बँड 5 पेक्षा थोडी मोठी स्क्रीन मिळेल.
Xiaomi कंपनी Mi Band 6 ची किंमत भारतात 3,000 रुपयांपेक्षा कमी ठेवेल, असा अंदाज आहे. Mi बँड 5 ची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. तर Mi Band 6 ची किंमत 40-50 डॉलर्स (2,900-3,600 रुपये).असून शकते असा अंदाज काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.
तर बातम्या
एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी
Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच
8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Mi Band 6 launching today with 30 sports Mode and at a very low price)