Dolby Vision, HDR 10+ Support, शाओमीचा 75 इंचांचा पहिला स्मार्ट टीव्ही लाँच, किंमत…

| Updated on: Apr 24, 2021 | 7:16 AM

शाओमीने (Xiaomi) आपला सर्वात प्रीमियम स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने आज हा टीव्ही एका व्हर्च्युअल कार्यक्रमात सादर केला.

Dolby Vision, HDR 10+ Support, शाओमीचा 75 इंचांचा पहिला स्मार्ट टीव्ही लाँच, किंमत...
Mi QLED TV 75
Follow us on

मुंबई : शाओमीने (Xiaomi) आपला सर्वात प्रीमियम स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने आज हा टीव्ही एका व्हर्च्युअल कार्यक्रमात सादर केला. या ऑनलाइन लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनीने Mi 11 अल्ट्रा, Mi 11X आणि Mi 11X प्रो हे स्मार्टफोन्स लाँच केले. तिन्ही स्मार्टफोन्स प्रीमियम कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहेत. सोबतच कंपनीने मोठ्या टीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. सध्या या सेगमेंटमध्ये खूपच कमी कंपन्या आहेत. (Mi QLED TV 75 with Dolby Vision and HDR 10+ support launched, know more)

नवीन टीव्ही 4K UHD पॅनेल आणि 120Hz रीफ्रेश रेटसह येतो. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि मल्टीपल कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. शाओमीने गेल्या महिन्यात भारतात पहिला रेडमी टीव्ही लाँच केला होता. अशा परिस्थितीत प्रीमियम युजर्सना लक्ष्य करुन कंपनीने नवा टीव्ही लाँच केला आहे.

टीव्हीची किंमत

भारतात MI QLED टीव्ही 75 ची किंमत 1,19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा 75 इंचांचा टीव्ही सर्वात किफायतशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रीमियम टीव्ही विभागात हा टीव्ही सॅमसंग आणि सोनी सारख्या ब्रँड्सना तगडी स्पर्धा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शाओमीने भारतात स्मार्ट टीव्ही बनवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय मार्केटमध्ये कंपनी येत्या काळात अजून काही टीव्ही लाँच करु शकते. दरम्यान, Mi QLED TV 75 खरेदी करताना एचडीएफसी बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना यावर 7500 रुपयांची सूट मिळेल.

फीचर्स आणि स्पेक्स

Mi QLED TV 75 मध्ये QLED 4K UHD पॅनल देण्यात आलं आहे, जे 3,840 x 2,160 रेजॉल्यूशनसह येते. यामध्ये 178 डिग्री व्ह्यूईंग अँगल देण्यात आला आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन, HDR 10+ आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये 1.5GHz चा मीडियाटेक MT9611 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये Mali G52 P2 GPU मिळतो. हा टीव्ही 2 जीबी रॅम आणि 32 जीबी नेटिव्ह स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

हा टीव्ही अंड्रॉयड 10 OS वर चालतो. तसेह हा टीव्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, यूट्यूबला सपोर्ट करतो. यामध्ये बिल्ट इन मायक्रोफोन फीचर देण्यात आलं आहे. जे हँड्स फ्री कंट्रोलसह येतं, जे अॅलेक्सा आणि Google असिस्टंटचा वापर करताना उपयोगी पडतं. हा शाओमीचा पहिला टीव्ही आहे ज्यामध्ये अॅलेक्सा सपोर्ट देण्यात आला आहे. ऑडिओसाठी, यामध्ये 30W स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोन ट्विटर्स आणि दोन वुफर्स मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0, HDMI 2.0 पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल. टीव्हीमध्ये बिल्ट इन क्रोमकॉस्टही आहे.

इतर बातम्या

90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह

Fact Check : सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री रिचार्जची ऑफर, मेसेजमधील दावा खरा की खोटा?

(Mi QLED TV 75 with Dolby Vision and HDR 10+ support launched, know more)