Mobile Addiction : झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल? अनेकजण करतात या चूका

| Updated on: Sep 07, 2023 | 8:48 PM

Mobile Addiction झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा हे बहुतेकांना माहीत नसते. जे लोकं मोबाईल जवळ ठेवून झोपतात, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओनेही याबाबत इशारा दिला आहे.

Mobile Addiction : झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल? अनेकजण करतात या चूका
मोबाईल किती दूर ठेवावा?
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोकांना मोबाईलचे इतके व्यसन (Mobile Addiction) लागले आहे की सकाळी उठल्याबरोबर फोन हवाच. एवढेच नाही तर जेवताना आणि झोपतानाही लोकं फोन सोडत नाहीत. याला मोबाईलचे व्यसन म्हणणे चुकीचे नाही. मात्र ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून आता सावध राहण्याची वेळ आली आहे. काही लोकांना मोबाईल उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. यामुळे खूप नुकसान होते.

झोपताना किती दूर ठेवावा मोबाईल?

झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा हे बहुतेकांना माहीत नसते. जे लोकं मोबाईल जवळ ठेवून झोपतात, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओनेही याबाबत इशारा दिला आहे. प्यूने एका अहवालात म्हटले आहे की, 90 टक्के किशोरवयीन आणि 68 टक्के प्रौढ लोकं मोबाईल उशी जवळ ठेवून झोपतात.

जरी यासाठी कोणतेही लेखी मानक किंवा निकष नाहीत. पण मोबाईलमधून बाहेर पडणारे रेडिएशन टाळण्यासाठी झोपताना ते दूर ठेवणे चांगले. मोबाईल तुमच्या बेडरूमपासून दूर ठेवणे चांगले. हे शक्य नसेल तर झोपताना मोबाईल किमान 3 फूट दूर ठेवा. असे केल्याने मोबाइलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो मॅग्नेटिकची शक्ती कमी होते. अशा प्रकारे तुम्हाला रेडिएशनचा त्रास होत नाही. म्हणूनच फोन उशीखाली ठेवून झोपू नका.

हे सुद्धा वाचा

मोबाईल रेडिएशनच्या परिणामाचे काही संकेतही मिळत आहेत. जे लोकं मोबाईल सोबत ठेवून झोपतात त्यांना धोक्यांबाबत WHO ने इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि प्रजनन क्षमता देखील प्रभावित होते. मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश झोपेला प्रेरित करणाऱ्या हार्मोन्सचा समतोलही बिघडवतो. त्यामुळे झोप येण्यास त्रास होतो आणि जैविक चक्रही बिघडते.