मुंबई : लेनोवोच्या (Lenovo) मालकीची स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने नुकतीच पुष्टी केली आहे की कंपनी 25 मार्च रोजी त्यांचा स्मार्टफोन मोटो जी 100 (Moto G100) लाँच करणार आहे. हा फोन मोटो एज एस (Moto Edge S) ची जागतिक आवृत्ती असेल जी कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला चीनमध्ये लाँच केली होती. (Moto G100 specification leaked ahead of launch know features and other details)
आता या स्मार्टफोनचे प्रेस रेंडर ऑनलाइन लीक झाले आहेत. टिपस्टर इव्हान ब्लासद्वारे (Evan Blass) लीक केलेल्या इमेजमध्ये हा फोन Iridescent Ocean कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. अशी अपेक्षा आहे की या फोनमध्ये मोटो एज एसचे फीचर्स असतील. मात्र, हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सादर केला जाणार आहे किंवा नाही, याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. या फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनच्या डाव्या बाजूला डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटण दिले जाईल, असे म्हटले जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस, कंपनीने त्यांच्या आगामी मोटो जी 100 स्मार्टफोनबद्दल एक टीझर व्हिडिओ पोस्ट केला होता. याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवल्यास कंपनी हा फोन मोटोरोला डेस्कटॉप मोडसह सादर करू शकते. लीकनुसार हा एक HDMI क्रॅडलसह डेस्कटॉप एक्सपीरियन्स प्रदान करेल.
Moto G100 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुल एचडी + डिस्प्लेसह सादर केला जाईल. ज्यामध्ये 1080×2520 पिक्सल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. या व्यतिरिक्त फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 (octa-core Qualcomm Snapdragon 870) दिला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये येईल. यासह, फोनमध्ये 1 टीबी पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्रॉयड 11 वर चालेल आणि त्याच्या साईडला फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल.
दुसरीकडे, या फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याला क्वाड-रियर कॅमेरा सेटअप आणि 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल तसेच सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. हा स्मार्टफोन स्प्लॅश रेझिस्टंट कोटिंगसह येईल आणि यामध्ये 20W टर्बोचार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाईल.
इतर बातम्या
पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल
हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका
(Moto G100 specification leaked ahead of launch know features and other details)