मुंबई : मोटोरोलाने (Motorola) नुकतेच युरोपमध्ये मोटो जी 10 आणि मोटो जी 30 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर्मन पब्लिकेशन TechnikNews ने कंपनीकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या तीनही G सिरीज स्मार्टफोनचे स्पेक लीक केले आहेत. यात मोटो जी 50 आणि मोटो जी 100 चा समावेश आहे. दरम्यान, कंपनी आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करू शकते ज्याचं कोडनेम Hanoip असं आहे. हे तीनही स्मार्टफोन एकाच वेळी किंवा वेगवेगळे लॉन्च केले जातील. लाँचिंगबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Moto G50, G100 and Hanoip are new upcoming Motorola Smartphones know specs snd price)
मोटोरोला मोटो जी 50 बद्दल बोलायचे झाल्यास या फोनचं कोडनेम सुरुवातीला Ibiza असं ठेवण्यात आलं होतं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पब्लिकेशनने आता युरोपमध्ये या फोनला मोटो जी 50 असे नाव दिलं आहे. असे म्हटले जात आहे की जी 50 ची किंमत जवळपास 20 हजार रुपये असू शकते.
मोटो जी 50 मध्ये एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 5000 एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये अँड्रॉइड 11 ओएस, 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, तर रियर पॅनलवर 48 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा असेल. फोन स्नॅपड्रॅगन 480 5 जी चिपसेटवर काम करेल.
या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स असेल. रियर कॅमेरा 108 मेगापिक्सलचा असू शकतो. त्याच वेळी, आपल्याला 16, 8 आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देखील मिळेल. डिव्हाइस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येईल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर देण्यात येईल.
जानेवारीत मोटोरोलाने स्नॅपड्रॅगन 870 एसओसी मोटोरोला एज S स्मार्टफोनची घोषणा केली होती, ज्याची किंमत 20,000 रुपये ठेवण्यात आली होती. हा फोन आता युरोपमध्ये मोटो जी 100 या नावाने सादर केला जाईल. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 256 स्टोरेजसह येईल.
तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार https://t.co/aDtGTR3siZ | #Lenovo | #Legion
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
इतर बातम्या
तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार
डुअल कॅमेरा, 60 तास कॉलिंग, जबरदस्त बॅटरीसह नवा स्मार्टफोन बाजारात, किंमत 7 हजारांहून कमी
ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री
(Moto G50, G100 and Hanoip are new upcoming Motorola Smartphones know specs snd price)