मुंबई : मोटोरोलाने (Motorola) अखेर भारतात मोटो जी 60 (Moto G60) आणि मोटो जी 40 (Moto G40) हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही बहुप्रतीक्षित स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा स्पेसिफिकेशन, शक्तिशाली प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि शानदार डिझाइनसह सादर करण्यात आले आहेत. मोटो जी 60 आणि मोटो जी 40 या दोन्ही स्मार्टफोन्समधील बहुतेक फीचर्स हे सारखेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ कॅमेराचा फरक आहे. (Moto G60 and Moto G40 Fusion launched in India with 6000mAh battery and 108MP Camera)
गेल्या काही महिन्यांपासून मोटोरोला कंपनी एकामागोमाग एक बजेट फोन बाजारात दाखल करत आहे. परंतु मोटो जी 60 आणि मोटो जी 40 फ्यूजनसह मोटोरोलाने मिड-रेंज सेगमेंटला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे मोटो जी 60 आणि मोटो एफ 40 (Moto F40) फ्यूजन प्रामुख्याने भारतासाठी तयार केले गेले आहेत. भारत हा पहिला देश आहे, जिथे मोटोरोलाने अधिकृतपणे मोटो जी 60 आणि मोटो जी 40 फ्यूजन हे स्मार्टफोन्स तयार केले आहेत, तसेच लाँचदेखील केले आहेत.
Moto G60 मध्ये HDR10 सह 6.80 इंचाची मॅक्स व्हिजन एफएचडी + डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz हाय रीफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. मोटो जी 60 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते. टर्बो पॉवर 20 चार्ज सपोर्टसह 6000 एमएएच बॅटरीसह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.
मोटो जी 40 फ्यूजनमध्ये मोटो जी 60 सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. तथापि, दोन स्मार्टफोनमधील कॅमेरे वेगवेगळे आहेत. मोटो जी 60 मध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. तर मोटो जी 40 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे परंतु त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. दोन्ही स्मार्टफोन मोबाइल सेफ्टीसाठी थिंकशील्ड तंत्रज्ञानासह येतात आणि अँड्रॉइड 11 वर चालतात. मोटो जी 60 मध्ये क्वाड-पिक्सल टेक्नोलॉजीसह 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
मोटो जी 60 चं 6 जीबी व्हेरिएंट भारतात 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. स्मार्टफोनचा पहिला सेल 27 एप्रिल 2021 रोजी सुरु होईल. मोटो जी 60 हा स्मार्टफोन आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड किंवा क्रेडीट आणि डेबिट कार्ड ईएमआयवर खरेदी केला तर ग्राहकांना या फोनवर 1500 रुपयांची सूट मिळेल.
#GoBeyond ordinary with the all-new #motog60! Grab yours at just ₹17,999 and get an instant ₹1500 off using ICICI bank cards & EMI transactions. Sale begins 27th Apr, 12 PM on @Flipkart. https://t.co/vwZvyh5YrV
— Motorola India (@motorolaindia) April 20, 2021
Moto G40 फ्यूजन च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर या फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही फोनवर ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
Be slow no more. #BlazeOn with the latest #motog40fusion! Starting at just ₹13,999 with an instant discount of ₹1000 using ICICI bank cards & EMI transactions. Sale begins 1st May, 12PM on @Flipkart. https://t.co/N3amjTkRfu pic.twitter.com/qwUHKwncBW
— Motorola India (@motorolaindia) April 20, 2021
इतर बातम्या
6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास
Samsung Galaxy A22 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास
3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल
(Moto G60 and Moto G40 Fusion launched in India with 6000mAh battery and 108MP Camera)