आता ऑनलाईनच होणार वाहन विमा नूतनीकरण, फेक विमा पॉलिसीला बसणार आळा

| Updated on: Feb 13, 2021 | 11:42 AM

आता ऑनलाईनच होणार वाहन विमा नूतनीकरण, फेक विमा पॉलिसीला बसणार आळा (motor insurance renewal will now be online only)

आता ऑनलाईनच होणार वाहन विमा नूतनीकरण, फेक विमा पॉलिसीला बसणार आळा
वाहन विमा नूतनीकरण
Follow us on

नवी दिल्ली : फेक वाहन विमा पॉलिसीला आळा घालण्यासाठी इंश्युरन्स रेगुलेटर आयआरडीएआय (IRDAI)ने आता वाहन विमा पॉलिसी नूतनीकरण ऑनलाईन करणे अनिवार्य केले आहे. यामुळे फेक विमा पॉलिसीला रोखण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला वाहन धारक वाहन विमा पॉलिसी घेतात, मात्र जेव्हा ते या पॉलिसी क्लेम करायला जातात तेव्हा ती पॉलिसीच फेक असल्याचे कळते. देशभरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे पॉलिसी नूतनीकरण प्रक्रिया केवळ ऑनलाईनच उपलब्ध करण्याचा निर्णय आयआरडीएआयने घेतला आहे. (motor insurance renewal will now be online only)

कशी होते ग्राहकांची फसवणूक?

जेव्हा ग्राहक वाहन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा कमी पैशात पॉलिसीची ऑफर दिली जाते. हे अनधिकृत एजंट ग्राहकांना सांगतात की, या पॉलिसीचा मार्केट रेट 20 हजार रुपये आहे. मात्र आम्ही तुम्हाला 15 हजार किंवा 17 हजार रुपयांत पॉलिसी नूतनीकरण करुन देऊ. अशा अनेक प्रकरणांमुळे विमा कंपन्याही हैराण आहेत. अशा घटना लक्षात घेता आयआरडीएआयने वाहन विमा पॉलिसी नूतनीकरण ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यम कोणतेही असो नूतनीकरण ऑनलाईनच

विमा नूतनीकरण घरबसल्या करा किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन करा, नूतनीकरण प्रक्रिया ऑनलाईनच असेल. मोबाईल अॅप किंवा पोर्टलद्वारे एजंट तुमच्यासमोर तुमची वाहन विमा पॉलिसी नूतनीकरण करुन देईल.

पॉलिसीवर क्यूआर कोड असणार

विमा पॉलिसी ऑनलाईन नूतनीकरणाबाबत आयआरडीएआयने कॅम्पेनही सुरु केले आहे. तुम्हाला जी पॉलिसीवर एक क्यूआर कोड देण्यात येईल. हा क्यूआर कोड जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर स्कॅन कराल तेव्हा पॉलिसीसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तुमचे नाव, गाडीचा क्रमांक आणि अन्य माहिती पाहू शकाल. क्यूआर कोडने तुम्ही तुमच्या पॉलिसीची खातरजमा करु शकता. वाहन विमा पॉलिसीबाबत आयआरडीएआयचे हे मोठे पाऊस मानले जातेय. यामुळे ग्राहक आणि विमा कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल. (motor insurance renewal will now be online only)

 

 

इतर बातम्या

घरात पडून असलेल्या सोन्यातून लाखो कमाव, काय आहे SBI ची खास Gold Scheme ?

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….