नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : गेल्या काही दिवसांपासून मोटोरोला कंपनीच्या आगामी आकर्षण असलेल्या Motorola edge 50 Pro स्मार्टफोन कंपनी नेमके केव्हा बाजारात उतरविणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सर्व शंकाना दूर करीत कंपनीने आपला हा फोन लवकरच बाजारात उतविणार असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनमधील कॅमेरा हा आधुनिक AI कॅमेरा असणार असून त्यामुळे अतिशय उत्कृष्ट फोटो काढता येणार आहेत.
मोटोरोला कंपनीचा आगामी आकर्षण असलेला फोनची जाहीरात कंपनीने केलेली आहे. मोटोरोलाने आपल्या नवीन फोनचा लॅंडींग पेज ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर तयार केले आहे. या फोनला तगड्या AI कॅमेऱ्यासह उतरविले जाणार आहे. मोटोरोला कंपनीने आपल्या फोनच्या डीझाईन लूक आणि काही वैशिष्ट्यांची आपल्या टीजरमध्ये माहीती दिली आहे. मोटोरोलाचा हा नवा फोन Intelligence meets Art या टॅगलाईनने बाजारात उतरविला जात आहे.
मोटोरोला कंपनीने कन्फर्म केले आहे की आपला आगामी Motorola edge 50 Pro हा फोन 6.7 इंच 1.5K 144Hz कर्व्ह पोल्ड डिस्प्ले सह बाजारात उतरविला जाणार आहे. फोनमध्ये 2000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR 10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह आहे. मोटोरोलाचा हा नवा भन्नाट फोन 50 MP रियर कॅमेरा आणि 13 MP अल्ट्रा वाईड कॅमेऱ्यासह उपलब्ध होणार आहे. हा फोन मॅक्रो सेंसरसह येणार आहे.
मोटोरोला फोन एआय अडॅप्टिव्ह स्टॅब्लायजेशन, ऑटो फोकस ट्रॅकींग, एआय फोटो एंहान्समेंट इंजन आणि टिल्ट मोडसह येणार आहे. हा फोन जगातील पहिल्या pantone validated कॅमेऱ्यासह बाजारात येणार आहे. जो ट्रु कलर्सना कॅप्चर करू शकणार आहे. मोटोरोला फोन बाजारात तीन रंगात खरेदी करु शकणार आहेत.