Motorola launches Moto G32 : मोटोरोलाने लाँच केला दमदार Moto G32 स्मार्टफोन… किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आहेत खास…

| Updated on: Aug 09, 2022 | 4:30 PM

Motorola launches powerful Moto G32 : तुम्हाला बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही संधी आहे. मोटोरोलाने नवीन, दमदार फीचर्स असलेला मोटो जी 32 स्मार्टफोन लाँच केला आहे. 

Motorola launches Moto G32 : मोटोरोलाने लाँच केला दमदार Moto G32 स्मार्टफोन... किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आहेत खास...
Motorola launches powerful Moto G32
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : मोटो जी32 (Moto G32) स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन (Budget smartphone) असून ज्यांना कमी बजेटमध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स असलेला फोन पाहिजे असेल, अशांसाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकणार आहे. या लेटेस्ट मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि अँड्रॉइड 12 लेटेस्ट इंस्टाग्राम सोबत उपलब्ध आहे. मोटो जी३२ मध्ये ग्राहकांना स्टीरियो स्पीकर्स सोबतच डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट देखील मिळणार आहे. बजेट फोन असूनही यात दमदार फीचर्स मिळत असल्याने हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. या स्मार्टफोनची 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12999 रुपये आहे, हा फोन सेटिन सिल्वर आणि मिनरल ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 16 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरू करण्यात येणार आहे.

काय आहे लाँच ऑफर्स

मोटो जी३२ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडे जर एचडीएफसी बँक कार्ड असेल तर त्यांना दहा टक्के इंस्टंट डिस्काउंट प्राप्त होणार आहे, अशा वेळी हा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 11749 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

डिसप्ले आणि सॉफ्टवेअर

फोन अँड्रॉइड 12 वर काम करत असून यात डुअल सिम (नॅनो) सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच फोनमध्ये 6.5 इंच की फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) डिसप्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे.

प्रोसेसर, रॅम

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सोबत 4 जीबीची रॅम दिली आहे. सोबत या फोनमध्ये 64 जीबीची इंटरनल स्टोरेज दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येते.

कॅमेरा सेटअप

फोनच्या बॅक पॅनेलवर तीन रिअर कॅमेरे दिले आहेत, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेंसर दिले आहेत. सेल्फी साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी

फोनमध्ये 4 जी एलटीई, ड्युएल-बॅंड वाईफाई, यूएसबी टाइप-सी, 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅकसारखे फीचर्स दिले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइडमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे. यासोबतच 33 वॉट टर्बोपावर फास्टिंग टेक्नोलॉजीसह 5000 एमएचची बॅटरी देखील स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.