नवी दिल्ली : मोटोरोलाने नुकताच आपला बजेट स्मार्टफोन Moto E7 Power भारतीय बाजारात बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,299 रुपये आहे. मोटो ई 7 पॉवरमध्ये काय खास आहे? कोणत्या कमतरता आहेत? वैशिष्ट्ये काय आहेत? याबाबत आम्ही या रिव्ह्यूध्ये सांगणार आहोत. (motorola’s new smartphone moto e7 power launched in indian market)
Moto E7 Power चे डिझाईन सामान्य स्मार्टफोन्सप्रमाणेच आहे. बॅक पॅनल पाहिल्यावर हा फोन काही वर्षांपूर्वीचा असल्याचे वाटते. कारण याचे डिझाईन जुने आहे. वर्ष 2019 ते 2020 दरम्यान विविध कंपन्यांनी अशा डिझाईनमध्ये अनेक स्मार्टफोन्स लाँच केले होते. तथापि, किंमतीच्या बाबतीत या फोनची बिल्ड गुणवत्ता चांगली आहे. याबाबत कोणतीही तक्रार नाही. हा फोन ना जड किंवा ना जास्त हलका आहे. मागील पॅनेल प्लास्टिक आहे. फोनच्या मागील बाजूस वर्टिकल कॅमेरा सेटअप आहे, जिथे तीन कॅमेरे आहेत. वरच्या बाजूला मध्यभागी मोटोरोलाचे ब्रँडिंग आहे आणि या मोटो डिंपलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. मागील पॅनेलवरच डाव्या बाजूला स्पीकरची जागा आहे. फ्रंटला डिस्पेलच्या चारही बाजूला पातळ बेजल्स तर खालच्या बाजूला थिक बेजल्स आहेत. बॉटममध्ये युएसबी टाईप सी पोर्ट आहे. वर हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये होम बटण, व्हॉल्युम की आणि गुगल असिस्टंटसाठी डेडिकेट बटण आहे.
Moto E7 Power मध्ये 6.5 इंचाचे एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्ले सेग्मेंटमध्ये डिसेंट आहे. सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. डिस्प्ले आकाराने मोठा असल्याने OTT कंटेंटही पाहू शकता. मात्र डायरेक्ट सनलाईटमध्ये या फोनचा डिस्प्ले नाराज करेल. त्यामुळे समलाईटमध्ये डिस्प्लेवरील कंटेंट वाचण्यास अडचण येऊ शकते. ओवरऑल या फोनचा डिस्प्ले चांगला आहे. हा 10 हजार रुपयांचा स्मार्टफोन असल्याने या फोनमध्ये हाय रिफ्रेश रेटची अपेक्षा करु शकत नाही. यात स्टँडर्ड रिफ्रेश रेट आहे.
Moto E7 Power मध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर दिले आहे. हा फोन आपण 4GB रॅम व्हेरिएंटसह खरेदी करु शकता. डेली टास्क रन करण्यासाठी फोन ठीक आहे. मात्र एकापेक्षा अधिक अॅप एकावेळी ओपन केल्यास फोनच्या स्पीडवर थोडा परिणाम जाणवेल. हा गेमिंग स्मार्टफोन नसला तरी तुम्ही सेटिंग कमी करुन गेमिंग करु शकता. बॅटरी बॅकअपही चांगले आहे. फोनमधील सॉफ्टवेअर आपल्याला स्टॉक अँड्रॉईडची भावना देते. हेवी कस्टमाइजेशन पाहिला मिळत नाही आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील सकारात्मक प्रभाव पडतो.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सल, दुसरे 2 मेगापिक्सल आणि तिसरा मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेर्यातून आऊटडोरमध्ये डिसेंट फोटो क्लिक करू शकता. इनडोअर आणि लो लाईट कंडीशनमध्ये कॅमेरा फिका आहे. मॅक्रो लेन्स 2 मेगापिक्सेलचे आहे. फोकस करणे थोडे अवघड आहे, परंतु आपण कॅमेरा योग्यरित्या सेट केल्यास मॅक्रो शॉट्स चांगले असतील. डेप्थ इफेक्ट एवरेज आहे. आपल्याला वाईड अँगलने फोटो काढायचे असतील तर तुम्हाला क्वॉलिटीशी समझोता करावा लागेल. सेल्फी कॅमेरा चांगला आहे.
Moto E7 Power मध्ये तुम्हाला 5000mAh पावरचे बॅटरी बॅकअप मिळते. यासोबतच युएसबी टाईप सी कनेक्टिव्हीटी आणि 10W चे सपोर्ट मिळते. याला फुल चार्ज करण्यासाठी 2 तासाहून अधिक वेळ लागतो. चांगली बाब म्हणजे तुम्हाला पावर बॅकअप चांगले मिळते. जर तुम्ही फोनचा लिमिटेड वापर करीत असाल तुम्ही दोन दिवसही बॅटरी चालवू शकता. मिक्स युजमध्ये एक दिवसाचा बॅकअप मिळेल, तर हेवी युजमध्ये संध्याकाळपर्यंत फोन चार्ज करावा लागेल. बॅटरी फ्रंटवर फोनची किंमत जस्टीफाय करता येते.
भारतीय मार्केटमधील 8000 रुपये रेंजचा हा स्मार्टफोन मोठा आहे. अन्य कंपन्यांनीही या सेंगमेंटमध्ये काही स्मार्टफोन्स सादर केले आहेत. मोटोरोला यात आधीपासून आहे आणि Moto E सीरीज या सेग्मेंटचा टॉप फोन आहे. या फोनची किंमत 7,499 रुपये आहे. मात्र Moto E7 Power हा Moto E लेवलचा नाही. (motorola’s new smartphone moto e7 power launched in indian market)
कडक लुक, दमदार परफॉर्मन्स, ‘या’ तीन 300cc बाईक्सना मोठी मागणी, तुमच्यासाठी परफेक्ट कोणती?#ClassicBikes #300ccBikes #RoyalEnfield #Jawa #Honda https://t.co/YVnx0Mqawx
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
इतर बातम्या
Miss world 2017 : मानुषी छिल्लर ‘या’ चित्रपटात विकी कौशलसोबत करणार रोमान्स!
लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची केळी फेकण्याची वेळ, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा