भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी मोठा धमाका ऑफर घेऊन आलेली आहे. दरम्यान रिलायन्स जिओने एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआयला टक्कर देणारा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तयार केला आहे. जिओच्या या स्वस्त प्लॅनची किंमत फक्त 49 रुपये आहे, या प्लॅनसोबत तुम्हाला कोणते फायदे मिळतील आणि हा प्लॅन किती दिवसांच्या वैधतेसह येतो? चला जाणून घेऊया.
जिओचा 49रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत तुम्हाला कंपनीकडून 1 दिवसाची वैधता मिळणार आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या अधिकृत साइटनुसार हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह येतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्लॅन तुम्हाला २५ जीबीच्या एफयूपी लिमिटसह मिळणार आहे. त्यामुळे तुम्हला कुठे बाहेर गेल्यावर मोठं मोठ्या pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी सर्वात उत्तम डेटा प्लॅन आहे.
एअरटेलचा 49रुपयांचा प्लॅन
49 रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये 1 दिवसाची वैधता आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अनलिमिटेड डेटासोबत येणारा हा प्लॅन 20 जीबीच्या एफयूपी लिमिटसोबत येतो.
व्हीआयचा 49 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाचा ही ४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे, हा प्लॅन तुम्हाला एक दिवसाच्या वैधतेसह मिळणार आहे, पण या प्लॅनमध्ये फक्त २० जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. त्यातच ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओचे हे रिचार्ज प्लॅन तिन्ही कंपन्यांचे डेटा पॅक आहेत.
४९ रुपयांच्या या डेटा पॅकमुळे प्लॅनसोबत तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग किंवा एसएमएस दिला जात नाही. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांकडे असे आणखी अनेक डेटा प्लॅन आहेत जे कमी किंमतीत उपलब्ध होतील, पण ४९ रुपयांचा प्लॅन खास आहे. कारण कोणतीही कंपनी इतक्या कमी किंमतीत अनलिमिटेड डेटाचा लाभ देत नाही.