Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याकडून Free क्रिकेट माध्यमातून Disney ला फटका

| Updated on: Aug 30, 2023 | 1:10 PM

Mukesh Ambani : वॉल्ट डिस्नेला भारतात फ्री क्रिकेटचे युद्ध छेडले. त्याला मुकेश अंबानी यांनी जबरदस्त खेळी करत डिस्नेला कोंडीत पकडले आहे. या खेळीने डिस्नेला चांगलाच फटका बसला आहे. या एका कारणामुळे कंपनीला मजबुरीत फ्री क्रिकेट मॅच दाखवावी लागत आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्याकडून Free क्रिकेट माध्यमातून Disney ला फटका
Follow us on

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : वॉल्ट डिस्नेने (Walt Disney) भारतात फ्री क्रिकेट मॅच (Free Cricket Match) दाखवण्याचा जुगार खेळाला आहे. डिस्ने हॉटस्टार यावेळी आशिया कप आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे हक्क पण कंपनीने विकत घेतले आहे. कंपनी मोबाईलवर त्याचे मोफत स्ट्रिमिंग करणार आहे. या धोरणातून कंपनी पुन्हा नफा कमाविण्याच्या विचारात आहे. तसेच नव्याने युझर्स संख्या वाढविण्यावर कंपनी भर देत आहे. अशात कंपनीचे अनेक युझर्स सोडून गेले आहेत. त्याचा फायदा लागलीच मुकेश अंबानी यांच्या जिओने घेतला. त्यांनी आयपीएलचे हक्क विकत घेतले. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी 2.9 अब्ज डॉलरमध्ये आयपीएलचे स्वामित्व, हक्क विकत घेतले होते. एवढंच नाहीतर क्रिकेट मॅचचे थेट मोफत प्रक्षेपण केले. त्यामुळे जुलै महिन्यात डिस्नेची सब्सक्राईबर्सची संख्या 21 दशलक्षने घटली. त्यामुळे आता अगोदरच वॉल्ट डिस्नेने काही चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात तग धरुन ठेवता यावी, यासाठी आता मजबुरीत फ्री क्रिकेट मॅच दाखवावी लागत आहे.

डिस्नेनला असा बसला फटका

वृत्त संस्था रॉयटर्सने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी डिस्ने हॉटस्टारकडे सर्वाधिक युझर्स होते. परंतु मार्च 2022 मध्ये कंपनीच्या काही धोरणांमुळे वापरकर्त्यांनी डिस्नेची साथ सोडली. यामुळे कंपनीचे 41.5 दशलक्ष डॉलरहून अधिकचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जुलै या महिन्यात एक तृतीयांश युझर्स डिस्नेला सोडून गेले. त्यामुळे कंपनीवर पुन्हा बाजारात मांड ठोकण्याची जबाबदारी आहे.

हे सुद्धा वाचा

सब्सक्रिप्शनची खेळी अंगलट

डिस्नी हॉटस्टारचा अंदाज साफ चुकला. भारतीयांना आता सवय झाल्याने ते प्रीमियम कंटेंटसाठी सब्सक्रिप्शन सोडणार नाहीत, सुरु ठेवतील, असा डिस्नेचा अंदाज होता. पण तसे झाले नाही. भारतीयांनी क्रिकेट न दाखविल्याच्या नाराजीतून डिस्नेला रामाराम ठोकला. त्यामुळे डिस्नेला युझर्स खेचून आणण्यासाठी डिस्ने हॉटस्टारवरुन मोफत क्रिकेट लाईव्ह करण्याचा एकमेव पर्याय उरला.

तर होईल फायदा

डिस्ने हॉटस्टारनुसार, क्रिकेट मॅचच्या दरम्यान त्यांची प्रेक्षक संख्या 50 दशलक्षावर गेली होती. जर असे झाले तर, मुकेश अंबानी यांच्या जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर आयपीएलची व्ह्युअरशीप पेक्षा ती 56 टक्के अधिक होईल. हा मोठा फायदा डिस्ने हॉटस्टारला मिळेल. त्यामुळे झालेले नुकसान भरुन निघण्याची शक्यता आहे.

सब्सक्रिप्शन मॉडेलचा फटका

डिस्नीने भारतीय स्ट्रीमिंग सर्व्हिस Hotstar खरेदी केले होते. त्यावेळी 2019 मध्ये 21वी सेच्युरी फॉक्ससाठी काही मालमत्ता, संपत्तीविषयी 71 अब्ज डॉलरची मोठी रक्कम मोजली होती. तर इंडियन प्रीमियम लीगचे स्ट्रीमिंगचे अधिकार खरेदी केले होते. त्यानंतर 2020 मध्ये डिस्ने हॉटस्टारने पेड सब्सक्रिप्शनचे मॉडेल आणले. या धोरणाचा फायदा होईल. कंपनीला 100 दशलक्ष युझर्स मिळतील असा अंदाज होता. पण हे मॉडेल त्यांच्या अंगलट आले.

जिओ सिनेमाने लावली वाट

2020 मध्ये डिस्ने हॉटस्टारने पेड सब्सक्रिप्शन सुरु केल्याने ग्राहक नाराज झाले. याच परिस्थितीचा जिओने फायदा उचलला. मुकेश अंबानी यांनी 2.9 अब्ज डॉलरमध्ये आयपीएलचे स्वामित्व, हक्क विकत घेतले होते. एवढंच नाहीतर क्रिकेट मॅचचे थेट मोफत प्रक्षेपण केले. त्यामुळे जुलै महिन्यात डिस्नेची सब्सक्राईबर्सची संख्या 21 दशलक्षने घटली.